Corona Virus ही नेमकी काय भानगड आहे ? कोरोना व्हायरस हा झूनोटिक (Zoonotic virus) विषाणूंचा खूप मोठा गट आहे. नोव्हेंबर 2002 साली चिनमध्येच उद्भवलेला सार्स ( Sever Acute Respiratory Syndrome - SARS ) आणि 2012 साली सौदी अरेबियात उद्भवलेला मर्स ( Middle East Respiratory Syndrome Corona Virus, or MERS‐CoV ) हे ही कोरोनाच्या गटातीलच विषाणू आहेत, त्यांचामुळे होणारा मृत्यू दर 10% व 35% अनुक्रमे होता तर कोरोनामुळे (Covid 19) होणारा मृत्युदर हा 2 ते 3% आहे . या विषाणूच्या आजाराची लक्षणे श्वसनसंस्थेशी निगडित असतात. कोरोना विषाणूंमुळे संसर्गजन्य आजार होतात व ते बऱ्याचदा सौम्य प्रकारचे आजार असतात. जशे की आपल्याला होणारी सर्दी खोकला हा पण त्याच प्रकारातील आहेत. परंतु संभाव्य प्राणघातक असतात. कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करणारी लस किंवा लागण झाल्यास घ्यायची असलेली औषधे अजूनतरी उपलब्ध नाहीत. कोरोना व्हायरसची सुरुवात कुठून झाली ? नोव्हेंबर 2019मध्ये कोरोना व्हायरसचा एक उपप्रकार चीनमधील वूहान शहरात आढळून आला. याला कोव्हिड-19( सुरवातीला n-Cov19 ) असे नाव देण्या...