सायंकाळची वेळ होती. वीर पुस्तक वाचत बसला होता. त्याच पुस्तकात मस्त मन लागलं होतं, कारण पुस्तक विरच्या आवडत्या लेखकाचं होते. तितक्यात मोबाईलवर फोन आला म्हणून विरच लक्ष विचलित झालं. पाहिलं तर काय, चक्क रेवाने कॉल केला होता. तशी रेवा विरची खूप जवळची आणि जिगरी मैत्रीण आहे, तरी त्यांना शेवटचं बोलून दोन महिने झाले होते. वीर ने फोन उचलला अन बोलायला सुरवात केली. हॅलो, बोला मॅडम. आज दिवस दक्षिणेकडून निघाला वाटतं. नाही रे तस काही, तुम्हीच वाट चुकलात. आम्हाला विसरले तुम्ही, म्हणून म्हटले आपणच फोन कराव.... रेवा बोलली. पाठीमागे का हटाव म्हणून वीर ने पण गुगली टाकली. वाट नेमकी कुणाची चूकली ते पाहाव लागेल ? भविष्याचा वेध घेत घेत मिळालं वाटत एकदाचं तुमचं भविष्य. ए गप्प रे, उठ सुट तू मला का बोहल्यावर चडवायच्या घाईमध्ये असतो??? अग तस नाही रे, तुझा घरच्यांनी स्थळ बघायला सुरू केले वाटते ना ?... म्हणून म्हणलो बाकी काही नाही... त्यांनी सुरू केले पाहायला, मार्केटमध्ये मोठं मोठाले लोक मोठं मोठ्या बोल्या (हुंडा) लावत आहेत. मला कोरोना बाबा पावला म्हण... सगळ्यांच बाहेर निघणे बंद झाले...आणि ...