सगळे कामे आटोपली आणि मी नेहमीप्रमाणे आपला मोबाईल बघत बसले होते.... प्रिया आहे का ???? आवाज आला म्हणून मी वर बघितले. त्यांच्याजवळ उठून गेले आणि त्यांना सांगितले.... या ना काकू घरात... ती बाहेर गेलीय, येईलच एवढ्यात.... मी औपचारिकता पार पाडली. आणि त्यांच्याकडे बघत स्मित देत मी परत मोबाईल मध्ये बघू लागली..... काय करतेय मोबाईल मध्ये....... मी मान वर केली आणि त्यांना सांगितले.... काही नाही काकू, फ्रेंड शी बोलतेय..... माझं नजर जरी मोबाईल मध्ये असली तरी माझे लक्ष त्या काकूंच्या हालचालीवर होते.... एक हात दुसऱ्या हातात दाबत, पायाला उगाच झटके देत होत्या. मी मुद्दामच त्यांना म्हणाले, खूप महत्वाचे काम होते का तिच्याकडे???? नाही नाही..... अगदीच फार नाही पण.... हा काकू मी फोन केला असता पण तिने मोबाईल घरीच ठेवलाय..... काही हरकत नाही, मी बसेल.... मी ओळख नसतांनाही त्यांच्याकडे बघून स्मित देत होती पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळाच खेळ सुरू होता.... काकू, काही बोलायचं आहे का????? खर तर हो, मी असं ऐकलय की तू...... मी मोबाईल बाजूला ठेवला आणि त्यांना परत म्हणाले, काय ऐकलय..... तू लिहतेस ना.. . हो, म्हणजे थोडं...