काही दिवसांपूर्वी, स्वराज्याचे संस्थापक आणि आपल्या सर्वांचे लाडके राजे, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची 390वी जयंती . मराठी मातीला स्वराज्याचे स्वप्न दाखवून पुर्ण करणार्या मातीच्या पुत्राची जयंती, आज खूप मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. पण महाराज एकच दिवसाच्या आठवणीसाठी आहेत का? की आयुष्यभराच्या आचारणासाठी? प्रथम आपण महाराजांचं " स्वराज्य " आणि त्यानंतर "आजची महाराष्ट्रातील पिढी महाराजांचा वारसा कसा पुढे नेत आहे ?", हे या लेखात पाहणार आहोत. ' स्व'राज्य म्हणजे स्वतःच राज्य . मोठा पराक्रम गाजवून, मराठी रयतेच स्वराज्य महाराजांच्या येण्याने पूर्ण झालं. नक्कीच ते मिळावंण एवढं सोप्प नव्हतच, कारण बलाढ्य अश्या आदिलशाही आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. याबद्दल आपण बालपणी इयत्ता चौथीमधील महाराजांच्या स्वराज्याबद्दल वाचलेच असेल, पण आज काही नवीन गोष्टी महाराजांबद्दल पाहायला मिळणार आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आणि वैभवशाली आहे. शिवाजी महाराज हे एक प्रचंड ज्ञानी, चतुर आणि दुरद...