काही दिवसांपूर्वी, स्वराज्याचे संस्थापक आणि आपल्या सर्वांचे लाडके राजे, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची 390वी जयंती. मराठी मातीला स्वराज्याचे स्वप्न दाखवून पुर्ण करणार्या मातीच्या पुत्राची जयंती, आज खूप मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. पण महाराज एकच दिवसाच्या आठवणीसाठी आहेत का? की आयुष्यभराच्या आचारणासाठी?
प्रथम आपण महाराजांचं "स्वराज्य" आणि त्यानंतर "आजची महाराष्ट्रातील पिढी महाराजांचा वारसा कसा पुढे नेत आहे ?", हे या लेखात पाहणार आहोत.
'स्व'राज्य म्हणजे स्वतःच राज्य. मोठा पराक्रम गाजवून, मराठी रयतेच स्वराज्य महाराजांच्या येण्याने पूर्ण झालं. नक्कीच ते मिळावंण एवढं सोप्प नव्हतच, कारण बलाढ्य अश्या आदिलशाही आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. याबद्दल आपण बालपणी इयत्ता चौथीमधील महाराजांच्या स्वराज्याबद्दल वाचलेच असेल, पण आज काही नवीन गोष्टी महाराजांबद्दल पाहायला मिळणार आहे.
शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आणि वैभवशाली आहे. शिवाजी महाराज हे एक प्रचंड ज्ञानी, चतुर आणि दुरदृष्टी असलेले रयतेचे राजे होते.
शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने जनतेचे जाणते राजे होते.महाराजांना प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान होते.महाराजांचे "शेतकरी क्षेत्रातील विचार व प्रयोग आजच्या काळात सुद्धा उपयुक्त आहेत.तसेच महाराजांची राजकीय रणनीती,सामाजिक विचार,धार्मिक साहिष्णुता,अभियांत्रिकी ज्ञान,स्थापत्य शास्त्र,युद्धनीती,अर्थज्ञान" हे सर्व आपल्या धोरणकर्त्यांना आज सुद्धा मार्गदर्शन करतात.त्यामुळे 'महाराजांना मॅनेजमेन्ट गुरु म्हणून सातासमुद्रापार' ओळखले जाते.
१. युद्धनीती, स्थापत्यशास्त्र व अभियांत्रिकी कौशल्य:
आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहीत असेल की शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे (नौसेना) संस्थापक होते. मराठी साम्राज्याच्या चोहोबाजूंनी मुघल, आदिलशाही आणि सातासमुद्रापार असलेले इंग्रज, डच, पोर्तुगीज यांच्यासारखे शत्रु डोळा ठेवून बसले होते. जंजिरा किल्ल्यामुळे आफ्रिकन हबशी सिद्दिच अरबी समुद्रावर वर्चस्व होत. त्यामुळे खूप वेळेस संकट उभी राहात आणि ते सर्वात आधी मोडून काढावी लागणार होती, त्यामूळे 1661 मध्ये मराठा आरमार तयार केले. पुढील 200 वर्ष मराठा आरमार असेपर्यंत इंग्रजाची शिरकाव करायची हिंम्मतच झाली नाही. याबदल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. तसेच महाराजांची स्थापत्य कला ही त्यांच्या गडकिल्ल्यांच्या (सिंददुर्ग हा किल्ला पूर्ण समुद्रात असून त्यामधील 2 विहिरीनां गोड पाणी असणे) उभारणीतून कळतेच. तसेच त्यांचा परगावातील कोयना नदीवरील बांधलेला पूल, जो 350 वर्षानंतरही वाहतुकीस मजबुत स्तिथीत उभा आहे. नक्कीच आपल्या राजकारणी आणि कंत्राटदाराने छत्रपतींच्या स्थापत्यकलेचा आदर्श घ्यावा.
मराठा आरमार
२. सामाजिक विचार,धार्मिक साहिष्णुता :
"मोघल, आदिलशाही, इंग्रज यांच्या विरोधात महाराजांची लढाई राजकीय होती, धार्मिक नाही". शिवरायांच्या सैन्यात सर्व धर्म-जातीचे लोक होते, त्यांच्यावर कधीही महाराजांनी भेदभाव होऊदिला नाही. काही राजकारणी हे शिवराय मुस्लीम विरोधी होते असे रंगावण्याचा प्रयत्न करतात. शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख दौलत खान होते. घोडदलाचे प्रमुख हा सिद्दी हिलाल होता. महाराजांचे पहिले सरसेनापती नूर खान होते. तसेच त्यांचा वैकिलांपैकी एक काझी हैदर एक मुस्लीमच होते, आता तुम्ही ठरावा महाराजांच्या सैन्यात उच्चपद भूषावणारे मुस्लीम होते म्हणजे महाराजांचा त्यांचावर नक्कीच विश्वास होता, तसेच त्यांच्या अंगरक्षकांमध्ये पण मुस्लीम होते. बऱ्याच किल्ल्यावर मुस्लीम सैन्याना प्रार्थनेसाठी मस्जिदी बांधण्यात आल्या होत्या. मग महाराज मुस्लीम विरोधी होते ??
आपले छत्रपती शिवाजी राजे सर्व जात-धर्म समभाव मानणारे होते हे कळूनच येत. म्हणून त्यांनी आपल्या सैन्याने जाती-धर्मांचा वाद मावळण्यासाठी "मावळा" संबोधले असावे. परंतु आज आपल्या देशातील जाती-धर्माला उद्देशून राजकारण्यांनी जातीय वाद प्रस्थापित केले हे पाहतच आहोत. असल्या राजकीय नेत्यांनी शिवाजी महाराजां समोर नतमस्तक नाही केलं तरी चालेल पण वाचायला आणि आत्मसात करायला हवंच.
एकदा महाराजांसमोर शेतकऱ्याच्या मालाला भाव की धर्मकार्य असे धर्मसंकट ऊभे होता, पण महाराज हे ज्ञानी व रयतेचे हीत जोपासणारे होते मग काय होणार ? "गरीब शेतकऱ्याचे नुकसान करून धर्मकार्य करणे हे अधर्मास कारण आहे" असे अज्ञापत्र काढले.
३. शेतकरी क्षेत्रातील विचार, त्यांच्याबद्दलची काळजी व प्रयोग:
महाराजांचा राज्यकारभार लोकाभिमुख होता व शिवाजी महाराज नेहमीच कष्टकरी व शेतकऱ्यांचे हित जोपासत. शिवकाळात अनेकदा दुष्काळ पडला. सिंचनाचे प्रमाण कमी होते. तरीदेखील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. कारण शिवरायांचे शेती आणि शेतकरीविषयक धोरण.
ते त्यांच्या किल्लेदारांना पाठवलेल्या पत्रातून आणि आज्ञापत्रातून दिसून येते. आपण हे इयत्ता दहावीच्या मराठीच्या पुस्तकात सर्वानी वाचलेच असेलच. त्यांनी सैनिकांना दिलेल्या या आज्ञा होत्या की "शेतकऱ्यांना लुटू नये, शेतकऱ्यांची चोरी करू नये, शेतकऱ्यांची इमानेइतबारे सेवा करावी. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठासदेखील मन दुखवू नये. शेतकऱ्यांच्या काडीसदेखील हात लावू नये. जर तुम्ही तसे कराल, तर तुम्ही आणि मुघल यांच्यात काय फरक उरेल". महाराजांचे शेतकऱ्याबद्दलची तळमळ तुम्हाला या लेखातून वाचायला मिळेल.
आज महाराज प्रसिद्धी पत्रकावर, भित्तीपत्रकावर, गाडीच्या समोरच्या फोटोत किंवा कारच्या पाठीमागील काचेवर लावण्यासाठी, गळ्यामध्ये लात्कावण्यासाठी, कपाळावर चंद्रकोर ओढणे, होर्डिंगवर महाजांच्या प्रतिमे सोबत स्वतःच्या प्रसिध्दीसाठी उरले आहेत का?
ज्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींच्या आदी एक स्त्री असलेल्या, मा जिजाऊंच्या नावाचा उल्लेख होतो. त्या महाराष्ट्र राज्यातील आणि भारत देशातील स्त्रियांची सामाजिक व न्यायिक स्तिथी कशी बनली, हे या लेखात नक्कीच सर्वांनी पहाव.
आज आपल्याला जो महाराजांचा इतिहास शिकवला जातो (काही दिवसा आदी तो पण वगळून टाकण्याचा प्रयत्न केला होता), तो त्यांचा लढाईंचा शिकवला जातो, जो की त्यांच्या न्यायव्यवस्थेचा, समानतेचा प्रेरणादायी इतिहास आपल्या समोर मांडला गेला नाही. हीच शोकांतिका नाही का?
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाही तर इतर महापुरुषांचे सुद्धा, स्वतःला त्यांचा "भक्त" म्हणून घेणारे, त्यांच्या नावाच्या घोषणा देत जयंती दिवशी मोटारसायकलवर त्यांचे चित्र असलेले झेंडे लावून जोरजोरात आवाज करत, मोठमोठाले DJ वाजवून, मद्यप्राशन करून DJ समोर नको त्या गाण्यावर नको तसा नाच करतात (हे त्या महापुरुषाला आवडेल का ?). भरधाव वेगाने वाहने पळवून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांचा नावाचा पताका आणि प्रतिमेचा वापर करतात, हेच आजचे "मावळे" का? (हे सर्व इतर सर्व महापुरुषांच्या जयंतीत कमी अधिक प्रमाणात होते).
की, स्वतःला त्यांचा "अनुयायी" समजून त्यांच्या गुणांना 'स्व'जीवणात पदोपदी आचरणात आणत त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने भजन कीर्तन, भाषण, पोवाडे व इतर समाज जागृतीचे व समाज घडवणुकीचे कार्यक्रम ठेवायचे, गोरगरीबाण सेवाद्यावी, अन्यायाच्या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी लढा द्यावा ?
आज सर्व महापुरुषांच्या नावाचे एवढे मोठे राजकारण करत आहेत. आपणही कुठे ना कुठे त्याच समर्थन करत आहोत किंवा त्याचे कारणीभूत आहोत असं वाटत नाही का?
थोर स्त्री-पुरुषांच्या पुतळ्याचा राजकारणी त्यांचा राजकारणाची दाळ शिजवण्यासाठी हवा तसा, आपला व प्रसारमाध्यमांच्या साह्याने पुरेपूर फायदा घेत आहेत. मुळात पुतळे हे जनतेसाठी नाही तर फक्त राजकारणी लोकांसाठी बनवल्या गेलेत अस वाटत नाही का?
खरच रस्त्याना महापुरुषांच नाव देणं म्हणजे त्यांची विटंबना होय, कारण त्याच रस्त्यावर किती तरी खड्डे पडतात, लोक अपघाताने त्याच महापुरुषांच नाव असलेल्या रस्त्यावर आपले प्राण सोडतात हे योग्य आहे का?. चौकात महापुरुषांचा पुतळा उभारतात, त्यांचे राजकारण निवडणूक आधी कसला तरी हार घालणं, काळ फेकून, पुतळे फोडण आणि त्यावरून सामाजिक वातावरण चिघळवण आणि तरुणांचे माते फिरवन हे आता दरवेळेसचच झालं!
एक बाजूने समाजातील काही लोक खरच खरोखर महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज जसा महाराजांचा आणि धाकट्या महाराजांचा खरा इतिहास घरा घरात पोहोचला तसाच घरा घरात महाराजांचे गुण आत्मसात करू लागतील, स्त्रियांना जसा शिवस्वराज्य वेळी मानसन्मान होता तस होण्यासाठी प्रयत्न होत आहेत, बरेच लोक शेतकऱ्यांना शाश्वत व सेंद्रिय शेती करणासाठी मदत करत आहेत. (जसा प्रत्येक घरासाठी एक "फॅमिली डॉक्टर" असतो, तसाच प्रत्येक घरासाठी "फॅमिली शेतकरी" का असू नाही ?). आज बऱ्याच कळानंतर जातीयता दूर करण्यासाठी बरेच "शिवाजी महाराजांचे मावळे" म्हणु शकतो जातीयता निर्मूलनासाठी सरसावले, हे पण खूप मोठा सकारात्मक सामाजिक बदल घडवत आहेत नक्कीच सर्व भारतीयांनी एकत्र येऊन महाराजांच्या काळातील सुखी, समृद्ध किंवा त्यापेक्षाही जास्त चांगल स्वराज्य, मा जिजाऊ आणि शिवरायांच्या आशीर्वादाने एक दिवसनिर्माण होईल. हीच अपेक्षा!

![]() |
चित्रकार: अंजली भगत |

स्वराज्य संस्थापक: छत्रपती शिवाजी महाराज |
"मरण आले तरी चालेल
पण शरण जाणार नाही"

शिवाजी महाराज व मराठी मावळे |

"आपण महापुरुषांना डोक्यावर घेतो, डोक्यात नाही"
जय भारत!!! जय शिवराय!!!
लेखक : एक_इंसान(विनोद )
![]() | ||||
दोस्तहो लिखाणाच्या तलवारी जागत्या ठेवा! | काळ वाईट आहे. |
जो पर्यंत डोक्यावर घेतलं जाईल तो पर्यंत हे स्वराज्य सार्थ होणार नाही.
ReplyDeleteThanks for sharing such valuable information.
Thanks for your reply.
Deleteवेगवेगळे जीवन पैलूंचा उल्लेख घेऊन त्यांची उत्तम वाक्यरचनेतून जी गुंफण केलेली आहे व त्या माध्यमातून शिवाजी महाराज यांचे जे जीवन चित्र लेखकाने रेखाटले ते वाचकावर छाप पाडतात.
ReplyDeleteThanks for your reply.
DeleteOnly the people r responsible for this if leaders r hiding the real history because we elect them.....
ReplyDeleteGive real respect for those who fight for us for our glorious history.....
We r secular country which have been created by raja CHHATRAPATI
And now how r we behaving... Who is creating the casting.. Who getting benefit of this division..... These r some Question people should think of it....
One request for everyone to respect for women and if she developed independently without any fear and nation will automatically grow..... ✌
Thanks for your reply. Keep reading and sharing.
Deleteमहाराजांचे विचार सध्यस्थीतीतही कसे लागू होतात हे यावरून पहायला मिळत.. Thanx for Sharing..
ReplyDeleteThanks for your reply. Keep reading and sharing.
DeleteMaharajanche barech pailu ....aaj wachyla milala .
ReplyDelete👍👍👌👌
Bharich lihilays.
ReplyDeleteNehmichya upekshit muddyanvar prakash taklays.
Good. Especially sheti related. Mala he bhari vatla ki Rajanchya kaalat shetkari atmahatya hot navtya. U rightly pointed that out.
Two things may not be correct- 1. Maharaj bhartiy nauseneche sansthapak ahet. Asa mi pn vachlay Wikipedia n all. But technically before maharaj Cholas cha motha samrajya hota ani tyancha khup mothi navy power hoti . So we need to check why Shivaji Maharaj is called as sansthapak of Indian navy.
2. (This is my personal opinion) jasa rajancha ladha Rajkiya ani samajik hota, swarajyasathi hota, tasach to kitihi nahi mhatla tari dharmik hotach. Pn to rajancha mothepana ani tyanchyatil sahishnuta ji tyanchyat hindu dharmamulech ali, mhanun tyanni pardharmacha adar kela. Pn te Hindavi swatajya ubha karnyasathi ladhle. Mhanje ladha dharmik dekhil hota. Shevti madhyayugin kaalkhand ahe. Tyachyahi kahi maryada ahet.
Baki lekh uttam ahe. Keep it up. 👌🏽👍🏽
I will search more on this and will be upgrade my knowledge.
DeleteThanks for your reply. Keep reading and sharing.
👌🏻
ReplyDeleteखुप छान. But we need to change the mentality and try to understand the way given by great personal until we don't understand , we can't follow.
ReplyDeleteThanks
ReplyDelete