Source : Google पुस्तक : फकिरा लेखक : अण्णाभाऊ साठे प्रकाशन वर्ष : 1959 पुस्तक प्रकार : कादंबरी (स्मृतिपर) मूळ किंमत :120/- पुस्तक पृष्ठ व प्रकाशक: 145 , सुरेश एजनसी अण्णाभाऊंचे साहित्य : तब्बल 32 कादंबऱ्या, 20 कथासंग्रह, जवळपास दोन डझन पोवाडे, तितकेच लोकनाट्य / तमाशे, कित्येक लावण्या व इतर किरकोळ लेखन. "फकिरा" ही कादंबरीचे भारतीय भाषांबरोबर रशियन, झेक, पोलिश, जर्मन या भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत. सोबतच "फकिरा"ला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरवले आहे. लेखकाबद्दल माहिती : अण्णाभाऊ साठे (1 ऑगस्ट 1920 - 28 जुलै 1969) यांना फक्त 49 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यातील अखेरची तीन दशके त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याची होती. सांगली जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात (वाटेगाव) व गावकुसाबाहेर ठेवलेल्या मांग(दलित) समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना शालेय शिक्षण मिळाले ते जेमतेम अक्षर ओळख ...