Source : Google
पुस्तकाचा आढावा (Book Review)
पुस्तक : होमो देअस (Homo Deus)
लेखक : युवाल नोवा हारारी (इस्राईल)
प्रकाशन वर्ष : 2016
पुस्तक कोणकोणत्या भाषेत उपलब्ध : मूळ पुस्तक इंग्रजीमध्ये असून ते मराठी, हिंदी, तमिळ व भारतातील आणि जगातील इतर मुख्य भाषांमध्ये उपलब्ध आहे
पुस्तकाचा प्रकार : वैज्ञानिक-इतिहासपर +मानववंशशास्त्र
लेखका बद्दल :
युवाल नोवा हरारी हे 44 वर्षांचे इस्राईल या देशाचे नागरिक असून आजच्या युगातील तरुण, प्रौढ आणि जगातील वाचकांचे प्रिय लेखक म्हणून नाव लौकिक मिळवलेले आहे. सद्या ते हिब्रू विद्यापीठ, इस्राईल इथे इतिहासाचे प्राध्यापक असून सोबतच ते लिखाण सुद्धा करतात. त्यांचे सर्वात नावाजलेले व करोडो लोकांनी वाचलेली "सेपियन्स (Sapiens)" हे पुस्तक सर्वांच्या ओळखीचे असेलच (नसेल तर नक्की वाचाल). सोबतच त्यांचे "होमो देअस" नंतर " 21व्या शतकासाठी 21 धडे / 21 lessons for 21 century" हे सुद्धा खूप प्रसिद्ध पुस्तक आहे. हरारी यांचे वैचारिक व मार्गदर्शक गुरू जगप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू सत्यनारायण गोयंकाजी असून हारारी यांनी गेली 15 वर्ष त्यांचा मार्गदर्शनपर चिंतन / ध्यान (विपश्यनापद्धती / meditation) करतात.
पुस्तकाबद्दल माहिती :
पुस्तक हे बरेच मोठे असून ते तीन भाग व 11 पाठ (chapters) मध्ये विभागले आहे. लेखकाचा लिखाणाचा केंद्रबिंदू हा होमो सेपीएन (म्हणजे आपण सर्व) आहे. पहिल्या दोन भागात लेखकाने मुख्यत्वे होमो सेपीएनचा इतिहासामधील मुख्य घडामोडी आणि त्यांच्या रचनेबद्दल मुबलक लिहिले आहे. सोबतच त्यात इतिहासातील मोठे संसर्गजन्य साथीचे रोग, त्यांचा पूर्ण इतिहास ते सद्या (2016) असलेल्या साथीच्या रोगाबद्दल खूप महत्वपूर्ण आणि वैज्ञानिक माहिती दिली आहे. पृथ्वीवरील इतर प्राणी त्यांच्या मधील झालेले जैविक बदल, मानवी विकास, सर्व प्राण्यांमधील आतापर्यंत झालेले जैविक व आनुवंशिक बदल याची संपूर्ण माहिती सोबतच जैविक काही समस्या असतील तर ते आधुनिक वैद्यकीय प्रक्रियेद्वारे कशा बदलता येईल याची नोंद आहे.
याव्यतिरिक्त मध्ययुगीन इतिहास आणि त्यातून उदयास आलेल्या वेगवेगळ्या संस्कृती व धर्म यांची इतर कुठेही एकत्रित उपलब्ध नसलेली माहिती आहे.
या पुस्तकामध्ये काही मुख्य मुद्यावर लेखकाने सहा ते सात पाठ (chapter) लिहिले आहेत, ते म्हणजे वेगवेगळ्या विचारसरणी, धर्मवाद, औद्योगिकरण, चंगळवाद व या सर्व गोष्टींचा भविष्यातील अस्तित्वाबद्दल विचार करण्यासारखी माहिती लिहिली आहे.
शेवटचा भागामध्ये लेखक सद्याच्या चौथ्या औद्योगिक क्रांती ने होऊ घातलेले घटकावर (IoT, digital cloud, Artificial intelligence, algorithms) भर दिला आहे. यांत्रिकीकरण,मुक्त व्यापार धोरण, रोबोटिक्स, संगणक, इंटरनेट , इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) व अल्गोरिदम यांचा मानवी जीवनावर सद्या व भविष्यात काय परिणाम होईल याचे संक्षिप्त आणि विचार करायला लावणारे तथ्य मांडले आहेत.
लेखकाचे म्हणणे आहे की सर्व मनुष्य हे जैवरासायनिक (जैविक) अल्गोरिदम आहेत व तशी माहिती दिली आहे. या सारखे बरेच ऐकायला आणि नव्याने विचार करायला भाग पाडणारी माहिती पुस्तकात दिली आहे.
अल्गोरिदमने (अ-जैविक) भविष्यात जर माहितीच्या भंडारासोबत (Digital Clouds) संगम करून कसा सर्व सृष्टी वर नियंत्रण करेन, "Internet of All things (IoAT)" ने जग पूर्ण काबिज करेन, भविष्यात निवडणूक घ्यायची पण गरज नसेल व एकच धर्म राहील (कोणता तो जाणून घ्यायचं असेल तर पुस्तक वाचाचं) या सारख्या चकित व विचार करायला लावणाऱ्या गोष्टी मांडल्या आहेत.
या पुस्तकात भविष्यातील मानव कसा असेल व मानवी भविष्य कोणत्या गोष्टीवर आधारलेली असेल याबद्दल भरपूर माहिती आहे, पण भविष्यातील पर्यावरण व त्याचा मानवी जीवनावर काय परिणाम होईल याबद्दलची माहिती "ना"च्या बरोबरच सापडेल.लेखकाने दशकाचा, शतकाचा नव्हे तर युगाचा मागोवा घेत त्याबद्दल माहिती या पुस्तकात दिली आहे.
पुस्तक वाचून मला पडलेले काही प्रश्न:
1. प्राणी हे फक्त जैवरासायनिक अल्गोरिदम आहे, आणि जीवन हे वास्तवात एक डेटा-प्रोसेसेसिंग आहे ?
2. जास्त मूल्यवान काय आहे - बुद्धी की चेतना ?
3. जेंव्हा अ-जैविक, अचेतन अत्यंत बुद्धिमान अल्गोरिदम आपल्या स्वतःला आपल्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू लागतील, तेव्हा समाज, राजकारण आणि दैनंदिन जीवनाची काय स्थिती असेल? (स्वतःच विचार करा की आताच आपल्या पेक्षा जास्त आपला मोबाईल व त्यातील इंटरनेट आपल्याला किती ओळखतो, आपल्याला जे आवडते ते ओळखून शोधून दाखवतो, (Youtube, amazon, facebook) यासारख्या सोशल मेडिया वर तुम्ही नीट पाहिलं तर कळेलच.
पुस्तकातील सर्वात जास्त आवडलेलं आणि भावलेलं उदाहरण:
आज संपूर्ण जगात "दिडशे करोड" पेक्षा खाजगी व सार्वजनिक कार आहेत, त्यांना रस्त्यावरून जाताना खूप जागा लागते तसेच प्रदूषण पण होते, त्यामुळे परत आपल्याला रस्त्याची रुंदी वाढवावी लागते, मोठं मोठाले पूल बांधावे लागतात, त्यामुळे सुद्धा प्रदूषण वाढते.
आज आपण (इथे उच्च व उच्च मध्यम नोकरदार वर्ग) दिवसाला कार जास्तीत जास्त दोन ते तीन तास वापरतो. जर का सर्व कार एका शहरासाठी किंवा देशातील सेंट्रल डेटा प्रोसेससिंग युनिट व अल्गोरिदमशी जोडल्या तर जेव्हा त्या कार वापर विरहित असतील किंवा आपल्याला बाहेर जायचं असेल त्या वेळेतच वापरल्या तर 150 करोड कारच्या जागी फक्त 5 करोड कार हे काम करू शकतील, यामुळे प्रदूषणही कमी होईल व जास्तीचे रस्ते बांधावे लागणार नाहीत.
(परंतू प्रत्येक जण स्वतःची कार सार्वजनिक करायला तयार होईल ? लोकांना स्वतःची कारच का लागते, सार्वजनिक कार का नाही वापरणार ? कोण ही system चालवेल; सरकार की खाजगी कंपनी? असे काही प्रश्न मला पडले आहे. परंतु हे सगळे होऊ शकते आणि त्यासाठी अप्रत्यक्ष प्रयत्न कार तयार करणाऱ्या कंपनीने चालू केली आहेत... जर लोकांची इच्छा असेल तर येणाऱ्या वीस वर्षात ही गोष्ट होऊ शकते !)
पुस्तकातील सर्वात जास्त माझ्यावर प्रभाव आवडलेली दोन वाक्य :
डेटावाद (Dataism, याबद्दल पूर्ण माहिती शेवटच्या पाठात आहे) होमो सेपिअन्सशी त्याप्रमाणेच धमकी देण्याचा प्रयत्न करत आहे ज्याप्रमाणे होमो सेपिअन्सने दुसऱ्या प्राण्यांशी वागला.
माणूस हा सर्व प्राणी व संगणकीय अल्गोरिदम यापेक्षा वेगळा एक कारणाने आहे, तो म्हणजे "माणसाचा अनुभव व त्यातुन शिकण्याची कला".
- लेखक : विनोद (एक-इंसान)
Source : Pinterest
आमच्या इतर लेख आणि गोष्टी :
१. दोघी...
२. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.
३. स्री ... सामाजिक दृष्टिकोनाच बुजगावण
४. एक चिट्ठी...
५. त्याचे ते निशब्द उत्तर.....
खुपच सुंदर पद्धतीने पूस्तकाची ओळख करुन दिली.
ReplyDeleteपूस्तकाचे हे वर्णन ऐकून सदर पुस्तक वाचून काढण्याची इच्छा तीव्र होते.