हॅलो, मी राजेंद्र बोलतोय, मला आपल्या बँकेतून एक माहिती हवी होती.... पलीकडून काहीतरी बोलले असावे, त्यावर राजेंद्र बोलला, होय सर, मला रिद्धी ची लग्नाची एक एफ डी बघायची होती. पुन्हा जरा थांबत राजेंद्र बोलला, त्या एफ डी मध्ये किती पैसे जमा झाले असतील ते जरा सांगाल का??? इकडून राजेंद्र ची बायको, रोहिणी ऐकत होती. फोन ठेवल्यावर रोहिणी राजेंद्र ला म्हणली, काय हो, किती जमा झालेत पैसे, अग आत्ताच नाही बँक उघडल्यावर सांगतो म्हणाले, तुमचा काय हो अंदाज, किती झाले असतील जमा.... नाही ग सांगू शकत, मला आता सोय करायला पाहिजे ना रिद्धीच्या लग्नाची.... होय, पण मी काय म्हणते, आपल्याला झेपेल एवढंच करूया...म्हणजे नाकापेक्षा मोती जड नको.... अग पण लग्न जरी आटोपते घेतले तरी बाकी पाहुणचार लागेलच ना... त्याची सोय करावीच लागेल नाही तर पोरीला सासरी त्रास नको.... अग म्हणून च मी घेण्यादेण्याची सोय करून ठेवतो म्हणजे आयत्या वेळेला पाणी उपसने नको.... म्हणजे नेमकं काय करायच ठरवलत??? एफ डी चे बघतो, जेवढे असेल तेवढे, बाकी जमा केलेले असेल ते, त्यातही नाही जमले तर मग कर्ज घ्यावे लागणार... मी काय ...