लेखक - विकास / आदर्श / श्रीकृष्ण
प्रकाशन - साधना
पृष्ठ संख्या - 152 (Pages)
किंमत - 150₹
लेखक - विकास / आदर्श / श्रीकृष्ण
प्रकाशन - साधना
2019 व 2020 मध्ये मी आदिवासी जमाती, आदिवासी भाग तेथील लोक, त्यांचं राहणीमान, त्यांचं खाद्य, त्यांचा पोशाख, मुख्य आकर्षण म्हणजे त्यांची संस्कृती पाहण्याचा योग "निर्माण"मुले आला, त्यानंतर विशेष ठरवूनच भ्रमंती केली. वर्धा जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाडे, तसेच गडचिरोलीतील अतिदुर्गम भाग (जिथे मोबाइलला रेंज नसते) जिथं सामान्य माणूस जाण्यास कचरतोच, असे काही भाग तिथे सामाजिक काम करणाऱ्या मित्रांच्या ओळखीने पाहण्यात व समजून घेण्यात आले.
आजच्या या युगात आदिवासीयांशी परिस्थिती व त्यांचा बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे, अशा काही तरुणांच्या मी शोधात होतो. काही दिवसापूर्वी मी साधना प्रकाशनात (पुणे) पुस्तक खरेदी करायला गेलो असता, मला तिथे एक पुस्तक दिसले त्याच नाव होतं "तीन मुलांचे चार दिवस". त्या पुस्तकाच्या कव्हर वर तीन मूल सायकल घेऊन पाठीमागे भल्या मोठया बॅगा घेऊन दिसले. मी प्रभावित होऊन ते पुस्तकाचा सारांश वाचला. मला पुस्तक जॅम आवडलं आणि लगेच खरेदी करून वाचण्याचा "बुक लिस्ट" मध्ये ऍड केलं.
कोरोना व त्यामुळे थोपवलेल्या लॉकडाऊनमध्ये पुस्तक वाचून टाकावं म्हणलं आणि श्रीगणेशा केला. पुस्तकात या तिघांचा महाराष्ट्र-छत्तीसगड-बस्तर via गडचिरोलीचा प्रवासाचा अनुभव/वर्णन आहे, पुस्तक एवढे आवडले की दिवसभर ऑफिसच काम करूनही तीन दिवसात वाचून पूर्ण झालं. आदर्श, विकास व श्रीकृष्णला शेवटचं पान वाचून झाल्या झाल्या प्रतिक्रिया देण्यासाठी रात्रीं साडेबारालाच व्हाट्सअप्प वर मेसज केले (त्यांचे नंबर पुस्तकात दिलेले आहेत).
मला पुस्तक वाचताना मी सुद्धा त्यांचा सोबत त्यांचा या मोहिमेवर आहे, असं वाटत होतं. त्यांची जिद्द पाहून खरच कौतुक वाटलं. सर्वांनी त्यांना सांगितलं होतं पुढे किती संकट आहेत, एव्हाना पोलीस, आर्मी व स्थानिकांनीही, परंतु त्यांचा निश्चय दृढ होता आणि तसा त्यांचा माणुसकी वरच्या विश्वासाने ते परत सुखरूप घरी सुद्धा आलेत.
मी पाहिलेल्या अति दुर्गम आदिवासी भागात सुद्धा आज काल तेथील स्थानिक बऱ्या पैकी कपडे घालत होते, मात्र नवीन जीवन आवश्यक गोष्टी जसे वीज व मोबाईल नेटवर्क तिथे पोहोचले नव्हते. पण जेव्हा पुस्तक वाचलं तेंव्हा कळलं आजही अशे भरपूर ठिकाण आहेत जिथे वीज, नेटवर्क, पक्की घर, वस्त्र आणि अन्न सुद्धा मुबलक मिळतं नाही. जंगलात एकही पक्षी, प्राणी मला व त्यांना दिसले नाही. माणसाची भूक निर्दयी असते हे वाचलं होतं, पण आता मात्र खात्री झाली.
सरकारच्या चुकीच्या धोरणाने आदिवासींचे जीवन किती धोक्यात येते, याच उदाहरण आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. सोबतच इच्छा नसताना लहान वयातच हातात शास्त्र उचलाव लागते, तोच आदर्श ही वाटू लागतो कदी कदी. शिक्षण तर दूरच पण जगण्यासाठीची दररोजची ओढाताण करावी लागतें. एखादा शिकला तर कित्तेकांचा सहारा बनतो, याचं उदाहरण म्हणजे लालसू दादा व त्यांचं कार्य पाहून कळेल.
सगळ्यात जास्त मला प्रभावित केलेली या पुस्तकातील गोष्ट म्हणजे बस्तर मधील "त्या आदिवासी" लोकांचा प्रामाणिक पणा व आपल्या संस्कृतीच आणि जमाती नाव आपल्या वाईट कृत्यामुळे खराब होऊ नाही याची आजच्या या लबाड, नैतिकता शून्य जगात पाहायला मिळणं, हे एक आश्चर्यच! आजच्या एवढ्या ऍडव्हान्स युगात तेथील प्रत्येक जण फक्त त्याचा आजच्या उदरनिर्वाहसाठी जगतो, त्यासाठी काम करतो, उद्याचा दिवसासाठी आपल्या सारखी साठववणूक नाही करत, जे निसर्ग देवतेने दिल आहे त्यात समाधान मानतो.
आरोग्य काय असते, आणि ते कसं जपायचे असते याची माहिती पण काहींना नाही. कारण "दादा" लोक व अकार्यक्षम शासन व्यवस्था यांच्या मनात आदिवासीयांना आरोग्य सुविधा पुरवण्याची काही गरज वाटत नसेल ? बरोबर जिथे शिक्षण नाही, जिथे त्यांचं अस्तिसत्व बाकी जगाला माहीत आहे की नाही, हे पण माहीत नाही, मग तिथे चांगली आरोग्य सेवा कुठून येणार? निसर्गातील माहीत असलेला व पूर्वपासूनची आयुर्वेदाच किंवा झाड पल्याचं ज्ञान त्याना तेवढं आहे अस दिसते.
पुस्तक वाचून एक गोष्टीने माझा मनातील तारांबळ उडवली ती म्हणजे 'यां पैकी कित्तेक लोकांना हे सुद्धा माहीत नाही की ते हिंदू धर्मात येतात! व त्यांचा धर्म कोणता?'.
या तिघांचे करावं तेवढे कौतुक कमीच आहे. चांगलं हसत खेळत जीवन व मोठ्या शहरात वाढलेले हे तिघे, आदिवासी लोकांसाठीची तळमळ व त्यांच्या जीवनमान संस्कृती जाणून घेण्याची ओढ, माणुसकी वरचा दृढ निश्चय पाहून खरच मन प्रसन्न झालं. यांचा सारखे तरुण मुलं देशाचा व देशातील अति दुर्गम शेवटच्या माणसाचा विचार करतात, हे गांधीजींच्या स्वप्नातील भारत साकार करण्याचा एक प्रयत्न आहे, असं कुठे तरी दिसतं.
पुस्तकात पुष्कळ गोष्टी आहेत, ज्या पुस्तक वाचून कळेल. इथे मी फक्त सारांश मांडण्याचा प्रयत्न केला, तरी बरंच लिहिलं गेलं. काय होती यांची मोहीम? का गेले होते ? कोणी पकडलं ? कशे सुटले? तिथला अनुभव के होता ? हे वाचूनच कळेल. मला वाटते प्रत्येक माणुसकीवर विश्वास असणाऱ्या माणसाने एकदा तरी हे पुस्तक वाचावं, त्यातल्या त्यात तरुणांनी नक्कीच. भविष्यात कुणासाठी काम करायचं ? हा प्रश्न पडला असेल तर, हे पुस्तक वाचून नक्की उत्तर मिळेल, अशी आशा आहे.
- विनोद छाया दगडुबा.
आमच्या इतर लेख आणि गोष्टी :
३. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.
४. स्री ... सामाजिक दृष्टिकोनाच बुजगावण
५. एक चिट्ठी...
६. त्याचे ते निशब्द उत्तर.....
Comments
Post a Comment