Skip to main content

काळजीपूर्वक : Covid 19 (कोरोना)


Corona Virus ही नेमकी काय भानगड आहे ?

कोरोना व्हायरस हा झूनोटिक (Zoonotic virus) विषाणूंचा खूप मोठा गट आहे. नोव्हेंबर 2002 साली चिनमध्येच उद्भवलेला सार्स (Sever Acute Respiratory Syndrome - SARS) आणि 2012 साली सौदी अरेबियात उद्भवलेला मर्स (Middle East Respiratory Syndrome Corona Virus, or MERS‐CoV) हे ही कोरोनाच्या गटातीलच विषाणू आहेत, त्यांचामुळे होणारा मृत्यू दर 10% व 35% अनुक्रमे होता तर कोरोनामुळे (Covid 19) होणारा मृत्युदर हा 2 ते 3% आहे. या विषाणूच्या आजाराची लक्षणे श्वसनसंस्थेशी निगडित असतात.
     कोरोना विषाणूंमुळे संसर्गजन्य आजार होतात व ते बऱ्याचदा सौम्य प्रकारचे आजार असतात. जशे की आपल्याला होणारी सर्दी खोकला हा पण त्याच प्रकारातील आहेत. परंतु संभाव्य प्राणघातक असतात. कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करणारी लस किंवा लागण  झाल्यास घ्यायची असलेली औषधे अजूनतरी उपलब्ध नाहीत.

कोरोना व्हायरसची सुरुवात कुठून झाली ?

नोव्हेंबर 2019मध्ये कोरोना व्हायरसचा एक उपप्रकार चीनमधील वूहान शहरात आढळून आला. याला कोव्हिड-19( सुरवातीला  n-Cov19 ) असे नाव देण्यात आले. सुरुवातीस वुहान व आसपासच्या प्रदेशात पसरलेला हा विषाणू त्याच्या इतर उपप्रकारांपेक्षा अधिक तीव्रतेचा असून याने रोग्यांच्या मरण्याचे प्रमाण कमी आहे, पण त्याचा प्रसार हा खूप लवकर होत आहे. आज पूर्ण जगात हा आजार पर्यटन व दळणवळणाने पसरला गेला. कोरोना ह्या विषाणूच्या आजारामुळे मृत्यचे प्रमाणे हे साधारण 2% ते 3% बाधित झालेल्या रुग्णांच्या प्रमाणात आहे, तरी बाधित रुग्णांची संख्या ही लाखोंमध्ये गेली आहे. मुळात ह्यामुळे बऱ्याच वृद्धांचे व श्‍वसनाचे आजार असलेल्यांचे प्राण गेले आणि अजूनही जात आहेत. एवढ्या सर्व  रुग्णांसाठी पुरेशी वैद्यकीय व्यवस्था नसल्यामुळे पण भरपूर बाधितांचे प्राण गेले (उदा. इटली, फ्रान्स,स्पेन व इराण). भारतात 130 करोड जनते साठी पुरेशी वैद्यकीय सेवा आहे का? नक्की विचार करा आणि काळजी घ्या!
     
कोरोना व्हायरसचा जागतिकपातळीवर झालेला परिणाम 
31 मार्च 2020 अखेर जगात  8,46,251 जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण 41,428 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 125 देशांमध्ये हा आजार पसरला आहे. या आजारामुळे सर्वाधिक 
इटलीत - 12428, 
स्पेन - 8269 ,
अमेरिका -3580,
फ्रान्स -3526,
चीन - 3305 ,
इराण - 2898 
बळी गेले आहेत.  बाधित रुग्णांपैकी 1,76 ,520 बरे झालेले आहेत . 

कोरोना व्हायरस आणि भारत :
दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत भारतातील कोरोना रोगाच्या रुग्णांचा आकडा 1600 च्या वर गेलेला आहे. भारतात एकूण 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या ,
1. महाराष्ट्र
2. केरळ
3. कर्नाटक 
4. उत्तरप्रदेश
5. तेलंगणा
जास्त प्रमाणात आढळून आहे. 

कोरोना व्हायरस आणि महाराष्ट्र ,
देशातील सर्वाधिक कोरोनाची  रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील इतिहासात अत्यावश्यक सेवा व सामग्री सोडून प्रथमच सर्व महत्त्वाची देवस्थाने दळणवळणाची सर्व साधने, अनावश्यक दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यात संचार बंदी,  जमाव बंदी आहे ती ३१ मार्च 2020 पर्यंत होती पण आता 15 एप्रिल पर्यंत असणार आहे. कदाचित ती पुढे पण एखाद महिना वाढू शकते.

Corona Virus ची लक्षणे व रुग्णांची माहीती :
1. कोरोनाची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे ताप, सर्दी आणि कोरडा खोकला
2. काही रुग्णांना वेदना, अनुनासिक रक्तसंचय, वाहणारे नाक, घसा खवखवणे किंवा अतिसार होऊ शकतो.
ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि हळूहळू सुरू होतात. काही लोकांना संसर्ग होतो पण त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यांना बरे वाटत असते.
3. बहुतेक रुग्ण (सुमारे 80%) विशेष उपचार न घेता या आजारातून बरे होतात. 
4. कोरोना होणार्‍या प्रत्येक ६ पैकी १ व्यक्ती गंभीर आजारी पडते आणि तिला श्वास घेण्यास त्रास होतो. 
5. वृद्ध लोक आणि उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा मधुमेह यासारख्या मूलभूत वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
6. ताप, कोरडा खोकला आणि श्वास घेण्यात अडचण असलेल्या लोकांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा .
Corona Virus कुठे ,किती वेळ  टिकतो :

Private Protection Equipment
Source : Google

       भारतात लॉकडाऊन सुरू होऊन 10 - 11 दिवस झालेत तरी लोकांपर्यंत कोरोना व्हायरस बद्द्ल गंभीरता दिसून येत नाही, आज मितीस देशातील कोरोंना बाधित रुग्णाची संख्या (1300) वर गेलेली आहे आणि ती दिवसागणिक वाढत जात/ जाणार आहे. यामध्ये महत्वाचे म्हणजे देशात लॉकडाऊन असून ही संख्या आहे, तर आपण विचार करायला पाहिजे, की लोकडाऊन जर नसते तर देशातीतील चित्र किती भयावय असते. या व्हायरस मुळे जनतेला काही नवीन शब्द ऐकायला मिळाले त्यापैकी काही :


1. Lockdown म्हणजे नेमके काय ? 
असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. कारण ह्या आधी आपण हा शब्द बहुदा ऐकलाच नाही.
 या अंतर्गत जिल्हाधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना आपापल्या परिसरात लोकडाऊन करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे , यामध्ये (लोकडाऊन)

  •  पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास (जमाव करण्यास )बंदी असते.
  • अत्यावश्यक सेवा सुरू राहतात जसे की ,

राशन दुकान, किराणा, बँका, ATM , हॉटेल , दूध, भाजीपाला दुकान, पत्रकार, दवाखाने, औषधी दुकान आणि ईत्यादी अत्यावश्यक वस्तू यामध्ये येतात .
Source: Google

2. Curfew  म्हणजे काय ? 
कर्फ्यु लागताच सर्व अधिकार जिल्हाधिकारी किंवा पोलिस आयुक्तांकडे येतात ,
IPC ACT 1860, कलम 144 नुसार कर्फ्यु लावण्याची तरतूद आहे व यानुसार कोणत्याही व्यक्तीने नियमाचे उल्लंघन केल्यास पोलिसांना सबंधित व्यक्तीलाअटक करण्याचा अधिकार आहे व त्याच्यावर IPC 188 नुसार कारवाही होते, Lockdown मध्ये असे होत नाही, जिल्हा प्रशासनाला कारवाही करण्याची सूट मिळते, दुकाने, भाजीपाला दुकाने, हॉटेल बंद ठेवावी लागते, कर्फ्यु म्हणजे सर्व काही बंद ठेवावे लागते... 
रस्त्यावर केवळ प्रशासन आणि पोलीस कर्मचारी वगळता कोणीही नसते, दवाखाने चालू असतात .

3. Quarantine म्हणजे काय ?
एखाद्या ससंर्ग जन्य आजाराची साथ सुरू आहे, अशा प्रदेशातून कोणी व्यक्ती आपल्या देशात आली असेल व वरवर निरोगी वाटत असेल तरी अश्या प्रवाशांना आपल्या देशात वेगळं ठेवलं जातं त्यालाच quarantine असे म्हणतात. त्या रोगाची देशात साथ पसरू नये म्हणून ही काळजी घेतली जाते . 

4. Isolation म्हणजे काय ?
संसर्गजन्य साथीच्या आजारात ज्यांना तो आजार झालेला आहे अशा व्यक्तीना इतर रुग्णापासून वेगळ्या वार्डात ठेवले जाते, कारण इतर रुग्णांना याची साथ होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते यालाच Isolation म्हणतात. 
    अश्या व्यक्तीवर उपचार केले जातात व संबंधित व्यक्ती त्या आजारारापासून पूर्णपणे बरा होत नाही तो पर्यंत त्याला Isolation मध्ये ठेवावे लागते / जाते.  

5.SOCIAL DISTANCING म्हणजे काय  ?
( किंवा physical distancing ).
संसर्ग जन्य आजार विशेषतः हवेतून पसरणारे श्वसनसंस्थेचे आजार टाळण्यासाठी हा एक महत्त्वाचा उपाय करावा लागतो, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, संपर्क करताना 3 - 6 फूट अंतर ठेवावे, साथीच्या आजाराच्या काळात शाळा, महाविद्यालये, चित्रपट गृह बंद ठेवावी लागतात तसेच मोठ्या कंपनीच्या कामगार वर्गांना सुट्टी दिली जाते किंवा घर बसल्या काम करायची सवलत द्यावी/ दिली लागते/जाते. 
जनसंपर्कातून होणारा रोगसंसर्ग टाळण्यासाठी असे उपाय करावे लागतात .
Source: Google

6. प्रोफाइल ऍक्सेस (Prophylaxis) औषधे म्हणजे काय ? व खरच मलेरिया वरील औषधाने कोरोना बरा होतो का किंवा त्याची लागण होत नाही का?
बाजारात मलेरियाचे औषध खरेदी करण्यासाठी खूप मोठी झुंबड उडाली होती, पण खरं हे आहे की मलेरिया वरील औषधे कोरोना रोखण्यासाठी घेणे योग्य नाही. त्याने शरीरावर खूप वाईट परीणाम होतात व मृत्यू सुद्धा होऊ शकतो आणि काही ठिकाणी तस झालं आहे.
     मलेरियावरील औषध हे एक प्रोफाईल एक्सेस औषध (Chemoprophylaxis) आहे, म्हणजे एखादा आजार होण्या आदी त्याची लागण होऊ नये म्हणून घेणतात येणारे औषध असते. जे कोरोना बाधितांच्या प्रत्यक्ष संपर्कात येतात (डॉक्टर किंवा रुग्णाच्या घरचे) त्यांच्या सुरक्षेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व गरजेनुसार हे औषधे दिले जाते.

7. एपीडिमिक (Epidemic), इंडिमिक (Endemic) व पांडेमीक (Pandemic) म्हणजे काय आणि त्यातील फरक ?
एपीडिमिक, इंडिमिक व पांडेमीक हे सर्व काही साथीचे रोगांचे प्रकार आहेत, त्यांना वेगवेगळ्या लोकसंख्या व ठिकानांच्यानुसार प्रसारानुसार नावे देण्यात आली आहे.
   इंडिमिक (Endemic) म्हणजे एका विशिष्ठ लोकसंख्या असलेल्या ठिकाणी कायमस्वरूपी अस्तित्वात असलेला आजार होय. उदाहरणात मलेरियाचे रूग्ण आफ्रिकेच्या काही भागात नेहमीच आढळतात, तसेच केरळमध्ये इबोला हा संसर्गजन्य आजार आढळतो.
   एपीडिमिक (Epidemic) म्हणजे एक भागात अचानक झपाट्याने होणारा संसर्गजन्य आजार होय. उदाहरणात सुरुवातीला चीनच्या उहान ह्या भागात कोरोनाची झपाट्याने वाढलेली संख्या.
  पांडेमीक (Pandemic) म्हणजे पुर्ण जगामध्ये एखाद्या संसर्गजन्य आजाराची मोठ्या प्रमाणात होणारी लागण होय. जसे की कोरोना, प्लेग, स्पॅनिश फ्लु, ब्लॅक डेथ नावाचे असे बरेच आजार.
  

कोरोना बद्दल काही समज व गैरसमज
लोकांना कोरोना विषाणू विषयी खूप सारे गैरसमज झालेले आहेत व कमी वैज्ञानिक माहिती आहे.

1.घरगुती उपचारामुळे कोरोनाचे संक्रमण  होते नाही का?
लसूण, गरम पाण्याने गुळणी करणे, व्हिटॅमिन सी, स्टेरॉईड घेणे, कापूर जाळल्याने कोरोनाच्या विषाणूची लागण होत नाही, असे सल्ले सोशल मीडियावर देण्यात येत आहेत. हे सल्ले काही आजारांसाठी महत्त्वाचे आहे, परंतु कोरोना व्हायरससाठी हे सल्ले योग्य नाही (अस करणे एक प्रकारचा धोकाच पत्करणे आहे). नागरिकांनी शरीरावर तिळाचे तेल, क्लोरीन किवा अल्कोहोलचा स्प्रे मारणे सुरू केले आहे. मात्र, त्यामुळे दिलासा मिळत नाही. ब्लीचसह 60 % पेक्षा जास्त इथेनॉल, पॅरासिटीक अ‍ॅसिड आणि क्लोरोफार्मसारखे काही किटाणुनाशक आहेत, जे कोरोना व्हायरस नष्ट करू शकतात, परंतु कोणतेही किटाणुनाशक पिणे योग्य नाही. ते धोक्याचे ठरू शकते.

2. कोरोना आजार इतर सर्व आजारांपेक्षा भयानक आहे का किंवा ज्याला कोरोनाची लागण झाली त्याचा मृत्यू अटळ आहे का?
  कोरोना हा एक विषयानुजन्य आजार असून त्याची लागण जास्त प्रमाणात होते. पण असं नाही की ज्याला हा आजार झाला, की त्याचा मृत्यू निश्चित आहे. आतापर्यंतची आकडेवारीनुसार लागण झालेल्या लोकांपैकी  2 ते 3 % टक्के रुग्णांचा मृत्यू होतो व त्यातही ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे व साठ वर्षापेक्ष्या जास्त आयुष्य असलेल्याचे प्रमाण जास्त आहे.

3. गाईचे किंवा इतर जनावरांचे गोमूत्र पिल्याने, तूप अंगाला, नाकाला लावल्याने किंवा त्यांचे शेन (गौऱ्या) जाळल्याने पूर्ण बरा होतो का?      
   अजुनपर्यंत तरी असं वैज्ञानिक दृष्ट्या, वैज्ञानिकांनी कुठेच स्पष्ट सांगितलं नाहीये व सिद्ध ही झालेलं नाही आहे. त्यामुळे हे उपाय करणे कधी टाळाणे उत्तमच आणि जर आपण असे करत असू तर आपण स्वतःला व इतरांना पण धोक्यात टाकत आहोत.

4. उन्हाळ्यामुळे किंवा तापमानामुळे व्हायरस नष्ट होतो का?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार(World Health Organization) हँड ड्रायरने व्हायरस नष्ट होत नाही किंवा अल्ट्रा व्हायलेट किरणेही योग्य नाहीत. ते त्वचेला इजा पोहोचवू शकतात. याची पुष्टी करण्याची कोणतीच पद्धत उपलब्ध नाही. उन्हाळ्यात तापमान वाढल्यास व्हायरस नष्ट होतो, हे पण अजूनपर्यंत वैज्ञानिकाच्या दृष्टीने सिद्ध झालेले नाही. हां पण नक्कीच कोरोनाच्या प्रसाराचा वेग उन्हाळ्यात थोडा का होईना मंदावेल.

5.मास्कवापरल्यामुळे आपले रक्षण होऊ शकते का किंवा कोणते मास्क वापरणे योग्य आहे?
   मास्कच्या प्रकार व वापरण्यासंदर्भात बरेच गोंधळ उडालेला आहे. एन ९५ (N 95) प्रकारच्या काही मास्कमुळे आपले रक्षण होऊ शकते. तोंड आणि नाक झाकण्यासाठी आपण दुपट्टा किंवा रुमालाचा मास्कसारखा उपयोग करीत असाल, तर आजाराला आपण रोखू शकणार नाही. प्रत्येक वेळी नाकावर आणि तोंंडावर मास्क चढवून ठेवल्याने संक्रमणाचा धोका वाढतो. पण ज्यांना खोकला सर्दी आहे त्यांनी मात्र नक्की नाकावर मास्क किंवा रुमाल बांधावा जे ने करून त्याचे विषाणू इतरांना लागू नयेत.
Source: Google

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महत्वाच्या वयक्तिक खबरदारी (सूचना)
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, गराजेशिवाय घराच्या बाहेर पडूच नये. अशी वेळ आली तर तोंडाला रुमाल बंधने किंवा मास्क वापरने उपयुक्त असते. आपले हात डोळ्यांना नाकाला तोंडाला लावू नयेत किंवा स्वच्छ साबणाने धुवून लावावे.कोणत्याही वस्तूला स्पर्श न करणे हे देखील उत्तम पर्याय आहे.
  • जर सर्दी खोकला असेल, तर जवळील डॉक्टरांना दाखवणे व डॉक्टरने सुचवलेली औषधे घेणे. अश्या वेळेस स्वतःला सर्वांपासून विलग (वेगळं) ठेवण स्वतः व इतरणासाठी आरोग्यदायी. थंड व आंबट पदार्थ खाणे टाळावे.
  • दर 2 तासांनी आपले हात कमीत कमी 20 सेकंद साबणाने स्वच्छ धुणे. आपले हात, तळवे, बोटांच्या मधील जागा, बोटांची अग्र (नखांचा भाग) स्वच्छ साबणाने किंवा डेंटॉल हँड वॉश ने स्वछ धुणे.
  • सॅनिटीझर की साबण हा प्रश्न असेल तर नक्कीच साबणानेच स्वच्छ हात कोपर्यपर्यंत धुणे उत्तमच राहते. पण जर साबण किंवा पाणी नसेल तर सॅनिटीझर (प्रवासात असाल तर सॅनिटीझर) वापराने योग्य आहे.
  • शिंकताना किंवा खोकताना रुमालाची घडी उघडून तोंड व नाकावर ठेवा. जर रुमाल नसेल तर हाताच्या कोपऱ्याचा भाग वापर करणे जे ने करून समोरच्या व्यक्तीपर्यंत त्याची बाधा पोहोचणार नाही.
  • दररोज व्यायाम करणे व सात्विक आहार खाणे हे कधीही उत्तमच.
  • घराच्या बाहेर खाद्यपदार्थ व भाजीपाला आणायचा असेल तर घरातील एकाच तरुण व्यक्ती ने जाऊन, कशाचा ही स्पर्श होणार नाही ही काळजी घेऊन आणावे. 
  • तसच बाहेरून आल्यानंतर लगेचच हात पाय स्वच्छ साबणाने धुणे व कपडे धुण्यासाठी टाकणे किंवा तेच कपडे उन्हात 4 तास वाळू घालणे, अश्याने त्यातील विषाणू मरतील आणि आणलेले सामान किमान 12 तास आणल्यानंतर वपरू नये (जे ने करून 12 तासात त्यावरील बाहेरील जीव-जंतू मरतील).                  
                                                                                          
 By.    Ammie C Pundge.
                                                                                       Ek_Insaan(Vinod )

Comments

  1. अगदी थोडक्यात आणि परत परत तीच माहिती, तोच पसारा सोडून लिहिलंय। After reading this i realised where corona lies in big picture, as u have completely covered in 360°, specially the legal nd social aspects nd also the myths. Keep it up🙌

    ReplyDelete
  2. Thank you for feedback. Your response is our motivation.

    ReplyDelete
  3. Comprehensive and easily understanding information about covid 19 and what precautions should be taken...

    Useful to create awareness among people...

    Keep it up ....

    ReplyDelete

Post a Comment

Popular Post

तीन मुलांचे चार दिवस - पुस्तक आढावा.

  लेखक - विकास / आदर्श / श्रीकृष्ण प्रकाशन - साधना  पृष्ठ संख्या - 152 (Pages) किंमत - 150₹ लेखक - विकास / आदर्श / श्रीकृष्ण प्रकाशन - साधना  2019 व 2020 मध्ये मी आदिवासी जमाती, आदिवासी भाग तेथील लोक, त्यांचं राहणीमान, त्यांचं खाद्य, त्यांचा पोशाख, मुख्य आकर्षण म्हणजे त्यांची संस्कृती पाहण्याचा योग "निर्माण"मुले आला, त्यानंतर विशेष ठरवूनच भ्रमंती केली. वर्धा जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाडे, तसेच गडचिरोलीतील अतिदुर्गम भाग (जिथे मोबाइलला रेंज नसते) जिथं सामान्य माणूस जाण्यास कचरतोच, असे काही भाग तिथे सामाजिक काम करणाऱ्या मित्रांच्या ओळखीने पाहण्यात व समजून घेण्यात आले.      आजच्या या युगात आदिवासीयांशी  परिस्थिती व त्यांचा बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे, अशा काही तरुणांच्या मी शोधात होतो. काही दिवसापूर्वी मी साधना प्रकाशनात (पुणे) पुस्तक खरेदी करायला गेलो असता, मला तिथे एक पुस्तक दिसले त्याच नाव होतं "तीन मुलांचे चार दिवस". त्या पुस्तकाच्या कव्हर वर तीन मूल सायकल घेऊन पाठीमागे भल्या मोठया बॅगा घेऊन दिसले. मी प्रभावित होऊन ते पुस्तकाचा सारांश वाचला. मला पु...

पुस्तकाचा आढावा - फकिरा

                                               Source : Google पुस्तक : फकिरा लेखक : अण्णाभाऊ साठे प्रकाशन वर्ष : 1959 पुस्तक प्रकार : कादंबरी (स्मृतिपर) मूळ किंमत :120/- पुस्तक पृष्ठ व प्रकाशक: 145 , सुरेश एजनसी अण्णाभाऊंचे साहित्य : तब्बल 32 कादंबऱ्या, 20 कथासंग्रह, जवळपास दोन डझन पोवाडे, तितकेच लोकनाट्य / तमाशे, कित्येक लावण्या व इतर किरकोळ लेखन. "फकिरा" ही कादंबरीचे भारतीय भाषांबरोबर रशियन, झेक, पोलिश, जर्मन या भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत. सोबतच "फकिरा"ला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरवले आहे. लेखकाबद्दल माहिती :         अण्णाभाऊ साठे (1 ऑगस्ट 1920 - 28 जुलै 1969) यांना फक्त 49 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यातील अखेरची तीन दशके त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याची होती. सांगली जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात (वाटेगाव) व गावकुसाबाहेर ठेवलेल्या मांग(दलित) समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना शालेय शिक्षण मिळाले ते जेमतेम अक्षर ओळख ...

छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते

काही दिवसांपूर्वी, स्वराज्याचे संस्थापक आणि आपल्या सर्वांचे लाडके राजे, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची 390वी जयंती . मराठी मातीला स्वराज्याचे स्वप्न दाखवून पुर्ण करणार्या मातीच्या पुत्राची जयंती, आज खूप मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. पण महाराज एकच दिवसाच्या आठवणीसाठी आहेत का? की आयुष्यभराच्या आचारणासाठी?      प्रथम आपण महाराजांचं " स्वराज्य " आणि त्यानंतर "आजची महाराष्ट्रातील पिढी महाराजांचा वारसा कसा पुढे नेत आहे ?", हे या लेखात पाहणार आहोत.      ' स्व'राज्य म्हणजे स्वतःच राज्य . मोठा पराक्रम गाजवून, मराठी रयतेच स्वराज्य महाराजांच्या येण्याने पूर्ण झालं. नक्कीच ते मिळावंण एवढं सोप्प नव्हतच, कारण बलाढ्य अश्या आदिलशाही आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. याबद्दल आपण बालपणी इयत्ता चौथीमधील महाराजांच्या स्वराज्याबद्दल वाचलेच असेल, पण आज काही नवीन गोष्टी महाराजांबद्दल पाहायला मिळणार आहे.       शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आणि  वैभवशाली आहे. शिवाजी महाराज हे एक प्रचंड ज्ञानी, चतुर आणि दुरद...