Skip to main content

Posts

"हीच का स्त्री "......

सगळे कामे आटोपली आणि मी नेहमीप्रमाणे आपला मोबाईल बघत बसले होते.... प्रिया आहे का ???? आवाज आला म्हणून मी वर बघितले. त्यांच्याजवळ उठून गेले आणि त्यांना सांगितले.... या ना काकू घरात... ती बाहेर गेलीय, येईलच एवढ्यात.... मी औपचारिकता पार पाडली. आणि त्यांच्याकडे बघत स्मित देत मी परत मोबाईल मध्ये बघू लागली..... काय करतेय मोबाईल मध्ये....... मी मान वर केली आणि त्यांना सांगितले.... काही नाही काकू, फ्रेंड शी बोलतेय..... माझं नजर जरी मोबाईल मध्ये असली तरी माझे लक्ष त्या काकूंच्या हालचालीवर होते.... एक हात दुसऱ्या हातात दाबत, पायाला उगाच झटके देत होत्या. मी मुद्दामच त्यांना म्हणाले, खूप महत्वाचे काम होते का तिच्याकडे???? नाही नाही..... अगदीच फार नाही पण.... हा काकू मी फोन केला असता पण तिने मोबाईल घरीच ठेवलाय..... काही हरकत नाही, मी बसेल.... मी ओळख नसतांनाही त्यांच्याकडे बघून स्मित देत होती पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळाच खेळ सुरू होता.... काकू, काही बोलायचं आहे का????? खर तर हो, मी असं ऐकलय की तू...... मी मोबाईल बाजूला ठेवला आणि त्यांना परत म्हणाले, काय ऐकलय..... तू लिहतेस ना.. . हो, म्हणजे थोडं...

दोघी...

सायंकाळची वेळ होती. वीर पुस्तक वाचत बसला होता. त्याच पुस्तकात मस्त मन लागलं होतं, कारण पुस्तक विरच्या आवडत्या लेखकाचं होते. तितक्यात मोबाईलवर फोन आला म्हणून विरच लक्ष विचलित झालं. पाहिलं तर काय, चक्क रेवाने कॉल केला होता. तशी रेवा विरची खूप जवळची आणि जिगरी मैत्रीण आहे, तरी त्यांना शेवटचं बोलून दोन महिने झाले होते. वीर ने फोन उचलला अन बोलायला सुरवात केली. हॅलो, बोला मॅडम. आज दिवस दक्षिणेकडून निघाला वाटतं. नाही रे तस काही, तुम्हीच वाट चुकलात. आम्हाला विसरले तुम्ही, म्हणून म्हटले आपणच फोन कराव.... रेवा बोलली. पाठीमागे का हटाव म्हणून वीर ने पण गुगली टाकली. वाट नेमकी कुणाची चूकली ते पाहाव लागेल ? भविष्याचा वेध घेत घेत मिळालं वाटत एकदाचं तुमचं भविष्य. ए गप्प रे, उठ सुट तू मला का बोहल्यावर चडवायच्या घाईमध्ये असतो??? अग तस नाही रे,  तुझा घरच्यांनी स्थळ बघायला सुरू केले वाटते ना ?...  म्हणून म्हणलो बाकी काही नाही... त्यांनी सुरू केले पाहायला, मार्केटमध्ये मोठं मोठाले लोक मोठं मोठ्या बोल्या (हुंडा) लावत आहेत. मला कोरोना बाबा पावला म्हण... सगळ्यांच बाहेर निघणे बंद झाले...आणि ...

स्री ... सामाजिक दृष्टिकोनाच बुजगावण

  Source: shutterstock.com           Article published Date : 16 Feb 2020               Article republish Date : 27 Aug 2020  (टीप: ज्या शब्दांच रंग बदलला त्यात माहितीच्या लिंक आहेत त्या वर क्लिक करून पाहू शकता!) ज्या महाराष्ट्र राज्यातून स्त्रीमुक्तीच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली त्याच राज्यात  भर दिवसा दोन महिलांना जिवंत जाळण्यात आले आणि त्यात त्या दोघींचाही मृत्यू झाला , आणि मागील 10 दिवसात 5 मुलींवर तेजाब(Acid Attack) फेकण्याचा घटना घडल्यात. नाही का ह्या लाजिरवण्या घटना ? जेंव्हा जेंव्हा स्त्रिया स्वबळावर समाजानी लादलेल्या अनिष्ट रूढी जश्या की, फक्त चुल आणि मूल ह्या पल्याड जाऊच नये, स्त्रीने शिकून काय करणार ? अश्या परंपरा मोडीत काडून वर येऊ पाहत आहेत, तेंव्हा तेंव्हा असले  विकृत-पुरुषी  मानसिकता असणारे पुरुष त्यांच्यावर शारीरिक व मानसिक  आघात करतात व त्यांची प्रगती थांबवण्यासाठी आतोणात प्रयत्न करतात. स्त्री समानतेच्या गोष्टी जे बोलताना दिसतात, त्यांच्या स्वतःच्या घरातील स्त्रील...

सुंदरता आणि चारित्र्य...

                            Source: Mission2k20.blogspot कसे आहात सगळे ...? बरेच दिवस झाले काही न काही निमिताने लिखाणातून तुम्हाला भेटायला यावं म्हणत होतो... शेवटी मिळाला एकदाचा तो मुहूर्त. कोरोनामुळे आपण सर्व हाल-बेहाल असाल हे मला ठाऊकच आहे, कारण गेले 5 महिने झाले मी एकाच रूममध्ये असतो, बाहेर जाण्याचा चान्स नाहीच. सारखं घरात राहून बऱ्याच जणांना नैराश्य जाणवत आहे. यात वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही; स्वाभाविक गोष्ट आहे ती. मला ही या नैराश्यातून जाव लागलं, अश्या वेळेस मी माझा जवळच्या व्यक्तींना, मित्र मैत्रिणी व घरच्या व्यक्तींना (ज्यांच्या सोबत आपल्याला मनमोकळं बोलायला चांगल वाटत) फोन करून किंवा जवळ असेल तर जाऊन मन मोकळं बोलत असे. बऱ्याच जणांना या नैराश्याच्या जराजास्त त्रास होत होता; अश्या वेळेस मला आठवण झाली ती मी ज्या संस्थेच्या सानिध्यात कोरोना आधी होतो म्हणजेच "प्रयास हेल्थ" पुण्यातील नावाजलेली मानसिक आरोग्यासाठी व लैंगिक शिक्षणासाठी काम करणारी संस्था.  त्यांनी व इतर काही एक्स्पर्ट डॉक्टरांच्या मदतीने नेस...