![]() |
Source: shutterstock.com Article published Date : 16 Feb 2020 Article republish Date : 27 Aug 2020 |
(टीप: ज्या शब्दांच रंग बदलला त्यात माहितीच्या लिंक आहेत त्या वर क्लिक करून पाहू शकता!)
ज्या महाराष्ट्र राज्यातून स्त्रीमुक्तीच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली त्याच राज्यात भर दिवसा दोन महिलांना जिवंत जाळण्यात आले आणि त्यात त्या दोघींचाही मृत्यू झाला, आणि मागील 10 दिवसात 5 मुलींवर तेजाब(Acid Attack) फेकण्याचा घटना घडल्यात. नाही का ह्या लाजिरवण्या घटना ?
जेंव्हा जेंव्हा स्त्रिया स्वबळावर समाजानी लादलेल्या अनिष्ट रूढी जश्या की, फक्त चुल आणि मूल ह्या पल्याड जाऊच नये, स्त्रीने शिकून काय करणार ? अश्या परंपरा मोडीत काडून वर येऊ पाहत आहेत, तेंव्हा तेंव्हा असले विकृत-पुरुषी मानसिकता असणारे पुरुष त्यांच्यावर शारीरिक व मानसिक आघात करतात व त्यांची प्रगती थांबवण्यासाठी आतोणात प्रयत्न करतात. स्त्री समानतेच्या गोष्टी जे बोलताना दिसतात, त्यांच्या स्वतःच्या घरातील स्त्रीला रात्री ७ नंतर घराबाहेर जाण्यास तंबी देतात व घरी येण्यास उशीर झाला तर खडेबोल सूनवतात (कदाचित हया समाजातील ज्या वाईट गोष्टी घडत आहेत त्यामुळे अशी मानसिकता बनलेली असावी).
या गोष्टी फक्त सामाजिक स्थरावर नसून राष्ट्रीय पातळीवर पण अनुभवायला मिळेल नुकतेच एका वृत्तपत्रातून एक बातमी वाचली. ती अशी होती : सैन्यदलांतील अधिकारपदांवर महिला असू नयेत, यासाठी ‘पुरुष त्यांचे आदेश ऐकणार नाहीत’ असा युक्तिवाद सरकारच न्यायालयात करते, ही नामुष्कीच.
अशी घाणेरडी मानसिकता बदला! असे न्यायालय सरकारला सांगते आहे. पण ती बदलणार कशी? ज्या महाराष्ट्रात महिलांच्या स्वातंत्र्याची पहाट झाली, त्याच राज्यात आजही भर दिवसा महिलेला पेटवून दिले जाते.. तेव्हा मध्ययुगीन मानसिकतेचाच प्रत्यय येतो जी की पुरुषी प्रधानतेला सर्वोच्च मानते.
स्त्रीने सामाजिक जीवनाच्या कोणत्याही प्रांतात पाऊल टाकायचे नाही, हा दंडक किती तरी दशके अतिशय कठोरपणे अमलात येत राहिला. अगदी मागील शतकाच्या मध्यापर्यंत ही जाणीव कायम ठेवण्यात पुरुषांना यश आले. परिणामी नाटकांत स्त्री भूमिका करण्याची जबाबदारी पुरुषांवर आली आणि स्त्रियांवर नाटक पाहायला येण्याचीही नामुष्की आली. ज्या समाजात शिक्षणाचा हक्कही केवळ पुरुषांकडेच राहिला, त्या समाजाने खूप आदळआपट करत तिला शिकायला परवानगी दिली, परिणामी समाजातील अभिसरण वेगाने होण्यास सुरुवात झाली. महात्मा जोतिबा फुले यांचे याबाबतचे कार्य महिलांसाठी नवे अवकाश तयार करणारे.राजश्री शाहूमहाराज, महर्षी कर्वे आणि त्यांचे चिरंजीव र. धों. कर्वे हे व ह्यांच्या सारखे इतर काहीच यांनी तेच काम अधिक व्यापक केले आणि स्त्रीला तिच्या हक्कांची जाणीव करून दिली. बर स्त्रीला त्याची जाणीव नव्हती का? नक्कीच होती! पण, पुरुषी विकृत मानसिकता असलेले बरेच स्वतःला मर्द म्हणून घेणारे अश्या स्त्रियांवर आपले अधिकार गाजवत आणि त्यांना फक्त उपभोगाचे साधन म्हणून पाहत असे. अबला ते सबला हा प्रवास याच काळातला. परंतु तरीही सामाजिक बदलांचा हा वेग देशाच्या सर्व भागांत सारखेपणाने पोहोचला नाही. शहरी भागात निर्माण होत असलेली आधुनिकतेची पहाट, ग्रामीण भागात पोहोचण्यास बराच विलंब झाला.
स्री-पुरुष समानता हा आधुनिकतेचा पाया होता आणि तो जगण्याच्या प्रत्येक पायरीवर स्पष्टपणे दिसू लागला होता. स्त्रीने-पुरुषाच्या बरोबरीने अर्थार्जन करणे यात मातबरी उरली नाही, तरीही देशाच्या ग्रामीण भागात आजही मुलगी वयात आली, की पहिल्यांदा तिला बोहल्यावर चढवण्याची घाई असणारे पालक दिसतात हा कल महाराष्ट्रामध्ये मुख्यतः मराठवाडा विभागात पाहायला जास्त मिळतो. मुलगी ही समाजाने तयार केलेली एक जबाबदारी असून ती लवकरात लवकर पुरुषाच्या स्वाधीन करण्यातच तिचे हित आहे, या कल्पनेवर अजुनही विश्वास असणारा समाजाचा एक भाग या देशात जिवंत आहे.
आजही देशाच्या अनेक राज्यात अंधार पडल्यानंतर घराबाहेर राहणे स्त्रियांसाठी सुरक्षित नसते आणि आता तर समाज आणि शासनाची निष्क्रियता इतकी वाढली की दिवसा ही स्त्रियांना बाहेर पडणे अवघड झालं आहे. ज्या महाराष्ट्रात महिलांच्या स्वातंत्र्याची पहाट झाली, त्याच राज्यात आजही भर दिवसा महिलेला पेटवून दिले जाते किंवा तिच्याशी अतिशय अश्लील वर्तन करून आपला पुरुषार्थ सिद्ध करण्याचा निर्लज्ज प्रयत्न होतो, हे लाजिरवाणे आहे आणि मानसिकतेतील बदलाच्या मंदावलेल्या वेगाचेही लक्षण आहे.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची यादी बरीच मोठी आहे; आपण त्यातील काही अती महत्वाच्या घटना पुराव्यानिशी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात:
१. स्त्रियांवरील होणारे शाररिक बलात्कार
"बलात्कार" हा शब्द ऐकूनच बऱ्याच जणांची पायाखालची जमीन नसल्या सारखं वाटते तर काहींच्या तळ पायाची आग मस्तकाला जाते, आणि फार फार तर लोक तस काही घडलं तर व्हाट्सअँप वर स्टेटस टाकून स्वतःच्या मनाची समजूत घालतात, तर ह्या पेक्षा जास्त मेणबत्ती घेऊन निदर्शन करतात( पण अस करणारे लोकही कमी असतात). पण हे निदर्शने पण जास्त काळ नाही टिकत आणि पीडितेला न्यायमीळेपर्यंत तर मुळीच नाही. करण आपणास ठाऊक आहे की दिल्लीमधील निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींची शिक्षा आतापर्यंत अमलात आणली नाही.
काहीजण बलात्कार होण्यामागचं कारण हे स्त्रियांचा पेहराव व त्यांची मनमोकळे बोलणे आणि मनाला जस राहावं वाटत तसं राहणे हेच समजतात. तर असं बोलणाऱ्या लोकांना एकच सांगू इच्छितो- दोष जर नजरेतच असेल न तर मग ती मुलगी/स्री लुगडं घालून असो, बुरखा घालून असो, की मग लहान बाळाचा फ्रॉक बलात्कार व इतर घृणास्पद गोष्टी त्यांच्या मनात चालतच असतील. लोकांचं म्हणणं ह्याबाबत काय असते हे समजून घेण्यासाठी 'द प्रिंट' ह्या ऑनलाइन चॅनेल न बनवलेला हा वरील व्हिडिओ नक्कीच सर्वांनी पहावा !
राष्ट्रीय गुन्हे नोंद (National Crime Record Bureau NCRB) च्या 2017 च्या आकडेवारी नुसार भारतात दर 15 मिनिटाला एक स्त्रीवरील बलात्काराची नोंदणी होते, फक्त नोंद होणाऱ्या घटनांची आकडेवारी दिवसाला 90 होती, आणि दिवसेंदिवस ही आकडेवारी भयभीत करणारी होत चालली आहे. 2018मध्ये हेच नोंदणी झालेले आकडे हे 34000 पर्यंत आहेत म्हणजे दिवसाला 93.
बर वरील सर्व नोंदी ह्या पोलिसचोकीमध्ये झालेल्या नोंद आहेत पण ज्या नोंदी केल्याचं नाहीत किंवा नोंदवल्याच नाहीत त्यांचं काय? म्हणजे एका वर्षात होणाऱ्या बलात्काराची नोंदी ह्या शासकीय आणि त्या पीडिता किंवा तिच्या नातेवाईकाने नोंदविलेल्या आहेत. पण सगळेच बलात्काराचे गुन्ह्यांची नोंद होत होते का बर? नक्कीच, नाही. कारण राष्टीय गुन्हे नोंद(NCRB) नुसार 2017 मध्ये 93% बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तीकडून केल्या गेलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामधील आणि मध्यप्रदेशमध्ये सर्वात जास्त अनुक्रमे 98.1% आणि 97.7% ओळखीच्या व्यक्तीकडून बलात्कार केल्या गेले आहेत. आता ओळखीची व्यक्ती म्हणजे कोण ? तर घरातील माणूस, मित्र, सह कर्मचारी इत्यादी.
तर सरळ सरळ आहे की घरातील व्यक्तीनेच बलात्कार केला तर लोक बदनामी पूर्ण घराची करतील आणि जिच्यावर बलात्कार झाली ती व्यक्ती पण घरातील आणि ज्यांनी केला ती पण घरातील. मग असल्या घटना हे लोक घराच्या बाहेर जाऊ देत नाहीत, घरातल्या घरात मिटवतात. बलात्काराचे सगळ्यात जास्त बळी हे लहान, अजाण(17 वर्ष्या खलील) आणि अपंग मुले असतात, त्यात त्यांचा कधीही आणि कसलाच काहीच दोष नसतो. पुढे त्यांच्या आयुष्याचा प्रश्न बानून राहिल म्हणून गोष्टी घरातच दाबल्या जातात. या संदर्भात प्रयास हेल्थ ह्या पुण्यातील सामाजिक संस्थेने 2 वर्ष लेंगिक शिक्षण आणि त्याची गरज या विषयावर अभ्यास करून 1500 लोकांच्या मुलाखती घेऊन त्यातून मिळालेल्या माहितीतून काही व्हिडिओ बनवले, त्यातील बाल अत्याचार एक विषय आहे आणि तो आपण वरील व्हिडिओमध्ये पाहूयातच!

Source : Google
एक अंदाजानुसार, जेवढे बलात्कार एका वर्षांत होतात त्यातील जवळ जवळ 30% ते 40% बलात्काराची नोंद होतच नाही, कदाचित मी हा आकडा जास्त मोठा लिहिला असेल, करण आपण ह्यात जर वैवाहिक बलात्कार ही घटना मानून चाललो तर तोच आकडा 5% मोठा होणं शक्य नाही. बऱ्याच जणांना वैवाहिक बलात्काराबद्दल माहीती पण नसेल? बरोबर, करण बलात्कार हा शब्द संभाषणाचा किंवा दररोजच्या गप्पा गोष्टींचा भाग बनतच नाही, तर तिथे वैवाहिक बलात्कार दूरच. वैवाहिक बलात्कार बदल आपण पुढील मुद्यात पूर्ण माहिती घेऊयात.
बलात्कार कोणावर होतात? बलात्कार कोण करतात?
बलात्काराची करणे? बलात्काराचे परिणाम? या मुद्द्यांवर एका दुसऱ्या लेखात सविस्तर माहिती घेवूयात.
बलात्काराची करणे? बलात्काराचे परिणाम? या मुद्द्यांवर एका दुसऱ्या लेखात सविस्तर माहिती घेवूयात.
२. स्त्री भ्रूण हत्या
"आपल्याला आई हवी असते, पत्नी हवी असते, मैत्रीण हवी असते, बहीण हवी असते, तर मग मुलगी का नको?" ह्या सारखी अनेक घोषणा, घोषवाक्य किंवा भिंतीवरचे वाक्य भरपूर ठिकाणी आपण पाहिले असतील! हॉस्पिटल सरकारी दवाखान्यात, रस्त्यांनी भिंतीवर, प्रदर्शनात आपणास हे पाहायला मिळतात असेल. पण आपल्याला हे माहीत नसेल की मागील दशकात 40 लाखांपेक्षा जास्त स्त्रीयांचे गर्भपात आणि मागील 30 वर्षात 1 करोड 20 पेक्ष्या जास्त गर्भपात हे पोटातील मूल मुलगी असल्या कारणाने करण्यात आले आहेत, यात कित्तेक मातांचे प्राण पण गेले आहेत ! प्रसूती वेळेस आणि प्रसूतीनंतर काही दिवसात काही आजारांनी.
"आपल्याला आई हवी असते, पत्नी हवी असते, मैत्रीण हवी असते, बहीण हवी असते, तर मग मुलगी का नको?" ह्या सारखी अनेक घोषणा, घोषवाक्य किंवा भिंतीवरचे वाक्य भरपूर ठिकाणी आपण पाहिले असतील! हॉस्पिटल सरकारी दवाखान्यात, रस्त्यांनी भिंतीवर, प्रदर्शनात आपणास हे पाहायला मिळतात असेल. पण आपल्याला हे माहीत नसेल की मागील दशकात 40 लाखांपेक्षा जास्त स्त्रीयांचे गर्भपात आणि मागील 30 वर्षात 1 करोड 20 पेक्ष्या जास्त गर्भपात हे पोटातील मूल मुलगी असल्या कारणाने करण्यात आले आहेत, यात कित्तेक मातांचे प्राण पण गेले आहेत ! प्रसूती वेळेस आणि प्रसूतीनंतर काही दिवसात काही आजारांनी.
ह्या सगळ्यांच कारण अनेक आहेत, मुख्य म्हणजे वंशाला दिवा हवा, मुलगी हे दुसऱ्याच्या घराचं धन असते, मुलीचा सांभाळ करण कठीण असते, मुलीच्या लग्न खर्चा सोबत हुंडापन द्यावा लागतो, दुसरी व तिसरी मुलगीच झाली तर, मुलगा हा म्हातारपनाची काठी असतो मुलगी नाही असे भरपूर बिनबुडाच्या कारणाने मातेची इच्छा असो वा नसो तिला तो गर्भपात करावा लागत होता आणि आता पण त्याच प्रमाण आहे फक्त ते थोडं कमी झालं आहे इतकच.
महाराष्ट्रात हे खूप समृद्ध आणि बऱ्यापैकी सुशिक्षित लोक राहतात, इथे पण अश्या लाखोंच्या संख्येने घटना घडल्यात तर विचार करा बिहार उत्तरप्रदेश हरियाणा झारखंड इत्यादी अती गरिबी असलेल्या आणि असुशिक्षित लोक राहणाऱ्या राज्यात काय हाल असेल? सुशिक्षित राज्यात हे प्रमाण बरंच होत.
महाराष्ट्रात हे खूप समृद्ध आणि बऱ्यापैकी सुशिक्षित लोक राहतात, इथे पण अश्या लाखोंच्या संख्येने घटना घडल्यात तर विचार करा बिहार उत्तरप्रदेश हरियाणा झारखंड इत्यादी अती गरिबी असलेल्या आणि असुशिक्षित लोक राहणाऱ्या राज्यात काय हाल असेल? सुशिक्षित राज्यात हे प्रमाण बरंच होत.
आज देश्यात दर 1000 पुरुषांच्या तुलनेत फक्त 930 च स्त्रियांची संख्या आहे. पूर्ण 201 देशाच्या तुलनेत भारताच्या स्त्री पुरुष गुणोत्तरमध्ये 191 वा नंबर लागतो, यापेक्ष्या खेदाची गोष्ट भारतीयांना नाही. हे गुणोत्तर जरी बरोबर करायचं झालं तरी 2100 पेक्ष्या जास्त वर्षाची वाट पहावी लागेल, जर स्त्री भ्रूण हत्या आता पासून थांबवली गेली तरच.
आपण नेहमी ऐकतच असतोल की बऱ्याच राज्यात लग्नासाठी मुलांना मुली भेटत नाहीत, इतर राज्याचा सोडा आपल्याच राज्यात एक उच्चभ्रु जातीतीतल लोकांना त्यांच्याच जातीतील मुली सोबत लग्न करण्यासाठी मुलगीच सापडत नाही वर ते मुलीच्या घरच्यांना पैसे ( इथे आपण हुंडाच समजूत, जो की मुलाकडील मंडळीने मुलीकडील मंडळीला लग्नासाठी) द्यायची वेळ येत आहे. तसाच प्रसंग इतर जातीतील मुलांना थोड्या बहोत फरकाने जाणवत आहे. आपण ह्याला स्त्री भ्रूण हत्या केल्यामुळे लोकांना लागत असलेला श्राप समजूयात का ?
३.वैवाहिक बलात्कार मानसिक बलात्कार
"बलात्कार हा एक घृणास्पद अपराध व गुन्हा आहेच आणि भारतीय कायदा पण हेच मान्य करतो". पण असा एक प्रकारचा बलात्कार ज्यात काही स्त्रियांवरील बलात्कार हा बलात्कार कायद्याने व समाजाने मान्य नाही. आता तुम्हाला वाटेल की हा काय विनोद आहे? नाही, हा विनोद नसून खर आहे!"हे सगळं तेंव्हा होत जेंव्हा कायद्याने लग्नकरून समाज मान्य असलेला नवराच करतो!" ह्यालाच वैवाहिक बलात्कार म्हणतात. म्हणजेच महिलेवर तिच्याच नवऱ्याने बलात्कार केला तर तो भारतात लागू होत नाही. कारण भारतात वैवाहिक बलात्कार कायद्याने गुन्हा समाजला जात नाही, या मुद्यावर भरपूर वर्षापासून वादविवाद चालू आहेत. एवढंच नसून याचा आधार घेऊन कोणतीही महिला ही घटस्फोटासाठी अर्ज ही करू शकत नाही. इथे थोडा वेगळा विचार करून पाहुयात एखाद्याव्यक्तीला त्याच्या जवळच्याच व्यक्तीने मारहाण करतो पण तो त्याबद्दल कायद्याने गुन्हा नोंदवू शकत नाही हे ऐकायला किती विचित्र वाटत आहे तसाच वैवाहिक बलात्कारमध्ये स्त्रीला तोच त्रास होत आहे आणि यात तिचा एवढंच दोष असतो की "ती त्या व्यक्तीची धर्म पत्नी आहे".
न्यायालय म्हणते की कायदे करण आमचा काम नाही ते सरकार व संसदेच काम आहे, आणि आतापर्यंतच्या सरकारने ह्याला कधीच मान्य केला नाही न संसदेत पारित करून घेतले नाही, करण हा मुख्य मुद्दा स्त्रियांचा आहे आणि आपल्या संसदेत आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारमध्ये एवढ्या प्रमाणात स्त्रियांच प्रतिनिधित्व नव्हतं आणि नाही, मग ही पुरुष प्रधान विचारधारा कसा हा मुद्दा संसदेत मांडणार आणि त्याच कायद्यात रूपांतर करेल?.
सद्या तर समाजात असा समज आहे की एकदा का मुलीला लग्नकरून आणले की ती आपली दासी किंवा गुलाम, "ह्याच उत्तम उदाहरण हे या वरील व्हिडिओमध्ये आहे प्रत्येकाने पाहवाच अशी विनंती आहे!". जेंव्हा नवऱ्याला इच्छा झाली त्यांनी पत्नीची सहमती न घेता तिच्यावर बळजबरीने संबंध ठेवतो, कारण त्याची ती पत्नी आहे आणि समाज व भारतीय न्यायपालिकेने त्याला हा हक्क दिला आहे. पण इथे विवादाचा मुद्दा हा आहे की पती त्याच्या इच्छा पत्नीसोबत नाही करणार तर कोणासोबत करणार? बरोबर आहे न ? पण दुसऱ्याबाजूचा समजदार पणाचा मुद्दा हा पण आहे की पतीनं त्याचा इच्छा-अपेक्षा पत्नीसोबत समजुदार पणान दोघांच्या इच्छेनुसार समंजस पणाने बोलून सोडवू शकता. तसच स्त्रीने पण त्याच्या व तिच्या इच्छा अपेक्ष्या, आपल्या मनातील भावना पतीसोबत बोलून आणि समजून सांगून सोडवू शकतात.
सद्यास्तिथीत भारतात मॅरिटल रेप म्हणजेच वैवाहिक बलात्कारासाठी कोणताही स्वतंत्र कायदा नाही आणि तशी "तक्रार नोंदवायची झालीच तर ती घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा किंवा भारतीय पिनल कोड (IPC) च्या 498 अ च्या अंतर्गतच नोंदवावी लागते". पण ह्यामध्ये बलात्काराची शिक्षा आणि घरगुती हिंसाचाराच्या अंतर्गत असणारी शिक्षा ह्यात खूप मोठा फरक आहे. या बाबत बीबीसी ह्या ऑनलाइन समाचार चॅनेल ने खुप छान व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यात पुर्ण माहिती दिली आहे हे तुम्ही वरील विडिओ वर क्लिक करून पाहू शकता.
![]() |
Source: shutterstock.com |
राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब सर्वेक्षण (NFHS) नुसार भारतात 70% महिला घरगुती हिंसेला बळी पडतात.
याच्या व्यतिरिक्त देह व्यापारासाठी मुलींची तस्करी त्यांचे अपहरण करणे, स्त्रियांवरील असिड हल्ले, वैवाहिक मारहाण करणे, हुंड्यासाठी छळवणूक करणे किंवा हुंडा बळी, ऊसतोड महिलांना गर्भपिशवी काढण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर लोक प्रवृत्त करणे(मासिक पाळी व गर्भधारणा यावेळी महिलांकडून कमी काम झाल्याने मालकाचे नुकसान होते म्हणून) आणि त्यानंतर त्यांना होणारा गर्भाशयाचा कर्करोग (Cancer) अश्या कित्येक घटनांमुळे त्यांचा छळ करणे व उपभोग घेणे हे पुरुषी मानसिकतेत भरलेलं आहे असाच वाटत आहे.
NCRB च्या आकडेवारी नुसार 2001 ते 2012 ह्या काळात हुंडाबळीच्या 91000 पेक्षा जास्त नोंदी भारतात झालेल्या आहेत. तरी हुंडाबळी कायद्या अमलात आलेला असून तो असे सक्ती ने लागू करायला खुप मोठा काळ उलटला, मुळात हा कायदा 1961 साली संसदेत पारित केला होता आणि हा कायदा सद्या स्तिथीत असून त्याची आकडेवारी आपण पाहून हताश झालाच असाल, म्हणजे कायद्याला प्रतिसाद मिळत नसेल तर कायदा करायचा नांही का? कुठे तरी त्या कायद्याचा धाक असलायला हवा त्याची शिक्षा ही कठोर असावी जे ने अस करण्याआदी आरोपीने 100 वेळेस विचार करायला हवा ! जवळपास प्रत्येक कायद्याचा कुठे न कुठे दुरुपयोग होतोच ! मग फक्त महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत कायदा करण्याची वेळ आल्यावर आपण अपवादाची एवढी काळजी का करतो ? मान्य आहे, की अश्या घटना होत पण असतील पण त्या बोटावर मोजण्या इतक्याच, मग त्याबाबत एवढा दिंडवरा पेटवण्याची गरज नाहीच.
NCRB - 2017 चा गुन्हे नोंदीची PDF मिळवण्यासाठी इथे क्लिक करा!स्त्रियावरील होणारे अत्याचार कशाप्रकारे कमी होतील व त्यावर काही उपाय हे आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत!
पुरुष वर्गाला पुरुषार्थ म्हणजे काय, याचा अर्थच उमगलेला नाही, याचे हे द्योतक. "यातून बाहेर पडण्यासाठी केवळ न्यायालये पुरेशी नाहीत. समाजातल्या सर्व स्तरांमधून समान हक्कांची जाणीव वेगाने झिरपत नेण्यासाठी कष्ट करावी लागेल, तसच आपली शिक्षण व्यवस्था हे मूल्य आधारित अवलंबवावी लागेल, पुरुषांनी पुढे येऊन या अन्यायी रुढीं विरुद्ध महिलांसोबत आवाज उठवून त्यांची साथ द्यावी लागले".
प्रत्येक पातळीवर प्रयत्न करत राहणे, हे अधिक महत्त्वाचे आहे आणि आपण सर्व मिळून निश्चय करूयात आणि तो अमलात पण अनुयात...
संविधान जागृतीच्या कार्यकर्त्या आणि उत्तम अश्या कवयित्री कविता अनुराधा ह्यांनी स्त्री मुक्तीच्या लढ्यात पुरुष्यांच्या मदतीसाठी खूप सुंदर अशी कविता लिहिली आहे, ती पाहूया आणि चिंतनात ठेऊयात ! लेखक : विनोद (एक_इंसान)
माझा श्वास , तुझा ध्यास
एकमेकांना भिडेल का ....?
स्त्री मुक्तीच्या या लढ्यात सजना सोबत येशील का ....
मी मुक्या बायांची कैवारी होईन
वाचा गुलामी हक्काची फोडीन
माझी हाक , तुझी तुझी दाद
अभिव्यक्ती ला जागेल का ...?
स्त्री मुक्तीच्या या लढ्यात सजना सोबत येशील का .............
मी जनाबाईची ओवी....
मी गौरी लंकेशची रे कवी ..
माझा सुर , तुझा उर ...
गीत क्रांतीचं गाईल का...?
स्त्री मुक्तीच्या या लढ्यात सजना सोबत येशील का .....
मी सावित्रीची रे लेक ...,
मला स्वातंत्र्याची रे भुक ...,
मी जिजाऊ ची रे लेक ...
पुरुष सत्तेला माझा रे धाक ...,
माझा विचार ..तुझा होकार
बायांची गुलामी, गुलामी तोडल का..
स्त्री मुक्तीच्या या लढ्यात सजना सोबत येशील का ....
मी न्यायाची मळीते वाट ...,
अन्यायाचा तु मोडून पाट ...!
करु समतच्या मोकळ्या वाटा ...,
परंपरेला देवु आम्ही फाटा ...!
ह्या रमाचा तु , ह्या सावीचा तु
भीमा, ज्योतीबा होशील का ...?
स्त्री मुक्तीच्या या लढ्यात सजना सोबत येशील का ....
8
तुझा रंगणा शंभू चा बाणा ....,
माझा जिद्दीने उभा रे कणा ....!
माझी जिगर ..., तुझी नजर ...
प्रिती मुक्तीची जडेल का ....?
स्त्री मुक्तीच्या या लढ्यात सजना सोबत येशील का ....
एकमेकांना भिडेल का ....?
स्त्री मुक्तीच्या या लढ्यात सजना सोबत येशील का ....
मी मुक्या बायांची कैवारी होईन
वाचा गुलामी हक्काची फोडीन
माझी हाक , तुझी तुझी दाद
अभिव्यक्ती ला जागेल का ...?
स्त्री मुक्तीच्या या लढ्यात सजना सोबत येशील का .............
मी जनाबाईची ओवी....
मी गौरी लंकेशची रे कवी ..
माझा सुर , तुझा उर ...
गीत क्रांतीचं गाईल का...?
स्त्री मुक्तीच्या या लढ्यात सजना सोबत येशील का .....
मी सावित्रीची रे लेक ...,
मला स्वातंत्र्याची रे भुक ...,
मी जिजाऊ ची रे लेक ...
पुरुष सत्तेला माझा रे धाक ...,
माझा विचार ..तुझा होकार
बायांची गुलामी, गुलामी तोडल का..
स्त्री मुक्तीच्या या लढ्यात सजना सोबत येशील का ....
मी न्यायाची मळीते वाट ...,
अन्यायाचा तु मोडून पाट ...!
करु समतच्या मोकळ्या वाटा ...,
परंपरेला देवु आम्ही फाटा ...!
ह्या रमाचा तु , ह्या सावीचा तु
भीमा, ज्योतीबा होशील का ...?
स्त्री मुक्तीच्या या लढ्यात सजना सोबत येशील का ....
8
तुझा रंगणा शंभू चा बाणा ....,
माझा जिद्दीने उभा रे कणा ....!
माझी जिगर ..., तुझी नजर ...
प्रिती मुक्तीची जडेल का ....?
स्त्री मुक्तीच्या या लढ्यात सजना सोबत येशील का ....
कवयित्री: कविता अनुराधा
आमच्या इतर लेख आणि गोष्टी :
१. हाक...
२. त्याचे ते निशब्द उत्तर.....
३. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.
Comments
Post a Comment