हॅलो, मी राजेंद्र बोलतोय, मला आपल्या बँकेतून एक माहिती हवी होती.... पलीकडून काहीतरी बोलले असावे, त्यावर राजेंद्र बोलला, होय सर, मला रिद्धी ची लग्नाची एक एफ डी बघायची होती. पुन्हा जरा थांबत राजेंद्र बोलला, त्या एफ डी मध्ये किती पैसे जमा झाले असतील ते जरा सांगाल का??? इकडून राजेंद्र ची बायको, रोहिणी ऐकत होती. फोन ठेवल्यावर रोहिणी राजेंद्र ला म्हणली, काय हो, किती जमा झालेत पैसे, अग आत्ताच नाही बँक उघडल्यावर सांगतो म्हणाले, तुमचा काय हो अंदाज, किती झाले असतील जमा.... नाही ग सांगू शकत, मला आता सोय करायला पाहिजे ना रिद्धीच्या लग्नाची.... होय, पण मी काय म्हणते, आपल्याला झेपेल एवढंच करूया...म्हणजे नाकापेक्षा मोती जड नको.... अग पण लग्न जरी आटोपते घेतले तरी बाकी पाहुणचार लागेलच ना... त्याची सोय करावीच लागेल नाही तर पोरीला सासरी त्रास नको.... अग म्हणून च मी घेण्यादेण्याची सोय करून ठेवतो म्हणजे आयत्या वेळेला पाणी उपसने नको.... म्हणजे नेमकं काय करायच ठरवलत??? एफ डी चे बघतो, जेवढे असेल तेवढे, बाकी जमा केलेले असेल ते, त्यातही नाही जमले तर मग कर्ज घ्यावे लागणार... मी काय ...
लेखक - विकास / आदर्श / श्रीकृष्ण प्रकाशन - साधना पृष्ठ संख्या - 152 (Pages) किंमत - 150₹ लेखक - विकास / आदर्श / श्रीकृष्ण प्रकाशन - साधना 2019 व 2020 मध्ये मी आदिवासी जमाती, आदिवासी भाग तेथील लोक, त्यांचं राहणीमान, त्यांचं खाद्य, त्यांचा पोशाख, मुख्य आकर्षण म्हणजे त्यांची संस्कृती पाहण्याचा योग "निर्माण"मुले आला, त्यानंतर विशेष ठरवूनच भ्रमंती केली. वर्धा जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाडे, तसेच गडचिरोलीतील अतिदुर्गम भाग (जिथे मोबाइलला रेंज नसते) जिथं सामान्य माणूस जाण्यास कचरतोच, असे काही भाग तिथे सामाजिक काम करणाऱ्या मित्रांच्या ओळखीने पाहण्यात व समजून घेण्यात आले. आजच्या या युगात आदिवासीयांशी परिस्थिती व त्यांचा बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे, अशा काही तरुणांच्या मी शोधात होतो. काही दिवसापूर्वी मी साधना प्रकाशनात (पुणे) पुस्तक खरेदी करायला गेलो असता, मला तिथे एक पुस्तक दिसले त्याच नाव होतं "तीन मुलांचे चार दिवस". त्या पुस्तकाच्या कव्हर वर तीन मूल सायकल घेऊन पाठीमागे भल्या मोठया बॅगा घेऊन दिसले. मी प्रभावित होऊन ते पुस्तकाचा सारांश वाचला. मला पु...