Skip to main content

दोघी...



सायंकाळची वेळ होती. वीर पुस्तक वाचत बसला होता. त्याच पुस्तकात मस्त मन लागलं होतं, कारण पुस्तक विरच्या आवडत्या लेखकाचं होते. तितक्यात मोबाईलवर फोन आला म्हणून विरच लक्ष विचलित झालं. पाहिलं तर काय, चक्क रेवाने कॉल केला होता. तशी रेवा विरची खूप जवळची आणि जिगरी मैत्रीण आहे, तरी त्यांना शेवटचं बोलून दोन महिने झाले होते.

वीर ने फोन उचलला अन बोलायला सुरवात केली.

हॅलो, बोला मॅडम. आज दिवस दक्षिणेकडून निघाला वाटतं.

नाही रे तस काही, तुम्हीच वाट चुकलात. आम्हाला विसरले तुम्ही, म्हणून म्हटले आपणच फोन कराव.... रेवा बोलली.

पाठीमागे का हटाव म्हणून वीर ने पण गुगली टाकली.

वाट नेमकी कुणाची चूकली ते पाहाव लागेल ?
भविष्याचा वेध घेत घेत मिळालं वाटत एकदाचं तुमचं भविष्य.

ए गप्प रे, उठ सुट तू मला का बोहल्यावर चडवायच्या घाईमध्ये असतो???

अग तस नाही रे,  तुझा घरच्यांनी स्थळ बघायला सुरू केले वाटते ना ?...  म्हणून म्हणलो बाकी काही नाही...

त्यांनी सुरू केले पाहायला, मार्केटमध्ये मोठं मोठाले लोक मोठं मोठ्या बोल्या (हुंडा) लावत आहेत. मला कोरोना बाबा पावला म्हण... सगळ्यांच बाहेर निघणे बंद झाले...आणि त्यांचं माझासाठी नवरोबा पाहण्याचं सर्च मिशन थांबलं.

( दोघेही हसू लागले..)

इकडून विर म्हणाला,
आम्हाला वर्क फ्रॉम होम आहे, काय सांगावं ते पण वर्क फ्रॉम होम करत असतील आणि ऑनलाईन तुझ्यासाठी "धनी" शोधत असतील.

जाऊदे रे.... करू दे त्यांना जे करायचं ते, मी कितीही त्यांना सांगितलं तरी ऐकणार थोडी आहेत... अजून एक-दोन वर्ष द्या म्हणत आहे; तर त्यांना कुठे दम...त्यांनी वेळ दिला असता तर केली असती डिग्री पूर्ण, अन एखाद वर्ष जॉब सुद्धा...

अग जरा त्यांचा मूड पाहून आई-दादा कुणाजवळ जाऊन प्रेमाने समजावून सांग ना....

तुला वाटते का रे, मी सांगण्याचा प्रयत्न केला नसेल..?

विरला काही सुचत नव्हतं काय बोलावे पुढे. ती खूप समजुदार आहे, हे मला ठाऊक होता₹च म्हणून मी फक्त "....हम्मम" म्हणालो

( रेवा तशी खूप मोठ्या घराण्यातील आणि एका मोठ्या एकत्रित कुटुंबातील मुलगी आहे. घरी करोडोची प्रॉपर्टी आहे, शेती पण कमी नाही. घरातील सगळे सरकारी नोकरीत आहेत. गावाचे पाटील आणि जिल्ह्यात नावाजलेल घराणं, वर घराण्यातील लोक राजकारणात पहिल्यापासून आहेत, मंत्र्यसंत्रा सोबत उठण बसणं असायचं. पैश्याची कुठेच कमी नव्हती, तरी घरची काही मंडळी पैशासाठी जोखमीचे काम करत पैसे कमवत होते. )

रेवा पुढे बोलू लागली,

काय रे विर... काय कामाचं माझं एवढं शिक्षण, जर मी त्याचा उपयोग होत नसेल...?  मला वाटलं शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे, त्याच शिक्षणाने इतर गरजू विद्यार्थ्यांना काही मदत करावी. जिल्ह्यात आणि विद्यापीठात पहिली असून सुद्धा माझं शिक्षण काहीही कामाचं नाही, असचं वाटत आहे...

विर शांत बसून तिच म्हणणं ऐकत होतो, मध्येच रेवा थांबली,थोडा औंढा गिळून पुढे बोलू लागली.

घरचे म्हणतात "खूप शिकली पोरी तू आता लग्नच वय झालं, संसार थाटावा लागेल... आपल्याकडे पैश्याला कमी आहे का ? का करायची कुणाकडे नौकरी न चाकरी..? एकदाचं लग्न झालं की तू आणि तुझा घरचे ठरावा, तुम्हाला पुढे काय करायचं ते".

अग पण, मग तुझं एवढं शिकण्याचा काय फायदा ? जर तुला तुझा पायावर उभे राहू देत नसतील. परत पुढे सासरची मंडळी नोकरीसाठी नाही म्हणाली किंवा नंतर शब्द पळाला नाही तर ..?

विर ने त्याच्या मनातील शंका तिच्या समोर मांडल्या.

अरे हो .... मला ही तोच प्रश्न पडतो आहे. लग्न काय माझ्याकडून चुकणार नाही, एक न एक दिवस करावेच लागेल. पण मला सांग यांच्याकडे कितीही पैसा असेल तर माझा काय कामाचा. मला पण माझा स्वाभिमान आहे, जेंव्हा मला माझा गरजेच्या गोष्टी हव्या तेंव्हा प्रत्येक वेळेस मी त्यांच्या समोर हात पसरवून मागायला आवडत नाही.

रेवा बऱ्यापैकी चिडलेली वाटू लागली, तिच्या बोलण्यातून तिच्या भावना व स्वप्नपूर्ती होण्याचे चिन्ह दिसत नव्हते.

विर, मी आत्तापर्यंत घरच्यांच्या पैश्याचा कधीच मोह धरला नाही. एवढा पैसे असूनही इकडे पैसे उडव तिथे पैसे उडव अस काहीही नाही केलं. मला घरच्यांच्या पैशावर शानशोक करायला नाही आवडत रे.... मला सामान्य घरच्या सारख रहावं वाटते, म्हणून माझी श्रीमंतीची आणि घराण्याची ओळख न दाखवता मित्र मैत्रिणी जोडायला आवडते. श्रीमंती व राजकारणी घराण्याला पाहून कोणी माझ्याशी मैत्री करायला पण सरसावत नाही.... एक पण मित्र नसावा अस त्यानं वाटते. कोणी मित्र म्हणून बोलला तर लगेच त्याला जाऊन मारून येतात. कंटाळा आला या सगळ्यांचा मला.

रेवा खवळलेल्या समुद्रासारखी भासत होती. विरला काहीच सुचत नव्हतं, की काय बोलावं यावर. विर शांत राहून ऐकत अधून-मधून "हं", "हम्मम" असे म्हणत होता. विरला तिच्या मनातील ही बाजू कधीच दिसली नव्हती. ती नेहमी हसत राहणारी, गप्पा गोष्टी मनसोक्त करणारी, सगळ्याचं मन जपत बोलणारी.... तस तिलाही प्रेमात पडायचं होत, खूप फिरायचं होत, सहलीला मैत्रिणी सोबत जायचं होतं, मित्र मैत्रिणीं सोबत पिकनिक आणि नाईटआऊट करायची होती.थंड ठिकाणी मैत्रिणी सोबत शेकोटी-अंताकक्षरी व डान्स करायचा होता, हे सर्व ती विरला सांगू लागली.

विर,आमच्या घरी मुलींना गावात एकटीने फिरु देत नाहीत. "मोठ्या व उच्च घराण्यातील मुली आहात, अस बाहेर निघून गावभर हिंडणे शेभत नाही" असं म्हणत.

रेवा मोठ्या सिटीमध्ये शिकायला होती, ते पण घरच्यांचा विरोधात जाऊन शिकली. रेवा मुळात एका समृद्ध गावाची राजकन्या आहे. पण मला आज तिच्या बोलण्यावरून एवढं कळलं की ती जरी "राजकन्या" भासत असली, तरी दासीपेक्षाही हीन जीवन जगत आहे.

लगेच तिच्या लक्ष्यात आलं की, 'आपण खूपच भावनिक झालो'.... म्हणून तिने विषय बदलला.

जाऊदे, माझ सोड तुझं सांग, कस चालू आहे तुझं?  काम वगैरे ठीक न? घरचे सगळे ठीक आहेत ना? काळजी घे, पुण्यात भरपूर कोरोना पसरला आहे...

विरला पण तिचे विषय बदललेलं कारण समजलं होत. "भिंतीला पण काण असतात".

विर ने सुद्धा तिच्या घरच्यांच्या, तिच्या स्वतःच्या ताब्याती बद्दल विचारलं. शेवटी दोघे पुस्तकाच्या गोष्टीवर ते आले.

रेवा बोलली, कोणतं पुस्तक वाचत आहेस ?

वीर उत्तरला, ' सेपीएन..'  यूवाल नोवा हारारी यांचं.

अरे मी पण ऐकलं या पुस्तकाबद्दल खूप भारी आहे म्हणे, पण खूप जास्त मोठे आहे आणि परत इंग्लिश... आम्ही थोडी तुमच्या सारखे हुशार बुवा....

रेवा विरची मजा घेत होती, हे विरला कळून आलं, कारण तिने ऑलरेडी युवाल नोवा हारारीचे "होमो डेअस" आणि  जपानीस फेमस पुस्तक "इकिगाई" इंग्लिशमध्ये एक महिन्यात वाचून काढले होते. मला हे स्नेहा कडून कळलेलं होत. स्नेहा ही रेवाची रूममेट होती. विरची पण तिच्याशी रेवामुळे ओळख झाली होती.

विर बोलला,
मॅडम, मी तुमचा ब्लॉग वाचतो बरं, तुम्ही लिहिलेले book review पण वाचले आहेत.

रेवाला कळलं आपल खोट पकडल गेल.

अरे असंच गम्मत करत होते तुझी म्हणत हसू लागली, इकडून विर पण मोठ्याने हसत होता.

बोलता बोलता अर्धा तास झाला, रेवाला स्वयंपाक करायचा होता. म्हणून तिने "बाय बाय बोलू परत कधी परत"...

विर लगेच बोलला,
"लग्नाला बोलवा म्हणजे झालं."

तिकडून रेवा म्हणाली "ते शक्य नाही विर".

कारणं दोघांना पण स्वतःला आवरता आलं नसतं.

"बाय बाय टेक केअर" बोलत फोन दोघांनी फोन ठेवले. वीर विचारांच्या दुनियेत हरवून बसला...


भाग अंतिम लवकरच...👍


भाग अंतिम -


विर रात्रीचे जेवणं करून त्याच्या रूममध्ये पुस्तक वाचत होता, पुस्तक लवकर संपवण्याचे भूत त्याचा डोक्यावर सवार होते.

परत एकदा मोबाईलची बेल वाजत होती, आता यावेळेस मात्र वीर उत्सुकतेने पाहायला गेला, शरयू चा फोन होता.

शरयू विरची दहावीपर्यंतची वर्गमैत्रीण होती. त्याच्या घराजवळच तिचंही घर होत, शंभर मीटरवरच. दिसायला सुंदर, पण अकडू स्वभावाची. तिला मैत्रीणी कमी न मित्रच जास्त होते, कारण तिचे मुलींशी पटत नसे. एकदम रोख ठोक स्वभावाची आणि जे मनाला वाटेल ते तोंडावर बोलनारी... शरयू डॉक्टर होऊन दहा महिने झाले होते, तिची इंटर्नशिप संपत आली होती आणि कोरोनाची ड्युटी पण लागणार होती.

बोल शरयू, कशी आहेस..?

बरी आहे रे... यार विर, माझी लवकरच कोरोनाचे पेशंट असलेल्या वॉर्डमध्ये ड्युटी लागणार आहे. आजपर्यंत पाच सहा फूट दुरून कॉन्टॅक्ट येत असत, आता डायरेक्ट कॉन्टॅक्ट. लवकरच मला पण कोरोना होईल वाटतं.

डॉक्टर साहेबा तुम्हाला काय ते डायरेक्ट तसेच आतमध्ये सोडणार आहेत का ? त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये...? सेफटी किट देतीलच?, विर बोलला.

हो रे, ते तर मिळेलच.पण अरे आतापर्यंत आम्हाला फक्त एक एन95 मास्क दिला होता आणि एक कापडाचा मास्क शिवून दिला. धुणार कधी नी घालानार कधी..?  काय सांगाव वॉर्डमध्ये गेल्यावर यांनी हलगर्जीपणा केला तर पक्की मी पोसिटीव्ह येणारचं.

( पोरगी चिडलेली वाटत होती, ती फक्त अश्या गोष्टी विरलाच सांगत असत, आणि तोही गुपचूप ऐकत असे. क्षणात तिला काय झालं माहीत आणि सकारात्मक मूड मध्ये बोलू लागली. )

वाटते की आतापर्यंत झाला पण असेल आणि त्याच्या अँटिबॉडी माझा शरीरात तयार पण झाल्या असतील. तुला माहीत आहे ना, मी तब्बेतीने "विक" असले तरी माझी इंमुनिटी हार्ड आहे. एक वर्ष होतंय साधी सर्दी पण झालेली नाही.

विरला आता शरयूची खोड काढावी वाटली, म्हणून त्याने मुद्दाम पेशंट किती वाढत आहेत? ते विचारले. त्याला माहीत होतं तिच्या शहरात पेशंट खूप वाढत होते. लोक सर्रासपणे कोरोना येण्याच्या पूर्वीसारख सगळं नॉर्मल असल्यासारखं मोकाट फिरत होते. शरयूला असलं मुळीच आवडलं नव्हतं आणि त्यांचावर चिडत म्हणाली,

"साठ सत्तर वर्ष्याचे लोक येतात आणि मेडिकल सर्टिफिकेट मागतात आणि कारण काय असतात ? तर 'आम्हाला लग्नाला जायचं, आम्हाला वाढदिवसाला जायचं...' यांच के जातेय, इथे आमची वाट लागत आहे. सहा सहा तास त्या पीपीई किटमध्ये राहावे लागते, ते पण न पाणी पिता, न बाथरूमला जाता. किट घातल्यामुळे भट्टीमध्ये आहोत कि काय असं वाटतं, पूर्ण घामाने अंग ओल होत...

'दोन महिन्यांपूर्वी, देवळात देव नाहीत, तर हॉस्पिटलमध्ये देव आहेत' अस स्टेटस ठेवून, नंतर थाळी-टाळी वाजवत स्वतःचा मोठेपणा दाखवला... पण देशातील जवळपास सर्व हॉस्पिटलमध्ये, तेवढ्या दूर कशाला मी ड्युटीला आहे ते सरकारी हॉस्पिटल असून आम्हा डॉक्टर लोकांनाच सॅनिटीझर आणि मास्क पण उपलब्ध नव्हते... तेंव्हा तर कोणी येत नव्हतं आम्हाला विचारायला... उग फुकटची "शो"बाजी करायची सवय यांना... आता पहा कसे मोकाट फिरत आहेत.... आमचे एक डॉक्टर ट्रिटमेंट करताना पोसिटीव्ह आले न वारले, बारा बारा तास ड्युटी करून वाचवत होते लोकांना.

शरयूच हे असं चिडण स्वाभाविक होतं, कदाचीत मी तिच्या जागी असतो तर मी पण असाच बोललो असतो, अस विरला वाटू लागलं. विर ने आता तिला शांत केलं. नव्या जुन्या गोष्टी चालू होत्या.

अरे यार, मी जे सांगण्यासाठी कॉल केला ते सांगायच विसरले...

वीर बोलला, नशीब कॉल ठेवल्यावर आठवलं नाही.

विर शांतपणे ऐक, ही गोष्ट आपल्या दोघातच ठेव..!

हो गं, तसेही मला कोणी तूझ्याबद्दल विचारत नाही आणि मी कुणाला कुणाबद्ल सांगत सुद्धा नाही...बोल तू बिनधास्त...

हो कसे विचारणार, जेंव्हा त्यांना काही झालं की लगेच कॉल करून शरयू गोळ्या सांगशील का ? काय झालं पाहशील का ? डॉक्टरला कॉल करून फीस कमी करायला बोल !  एवढे विचारायला फोन तेवढा करतात...

( शरयू त्यांच्या कॉलनीमधील पहिली डॉक्टर आणि सर्व तिला ओळखत असे. जेंव्हा मेडिकलला नंबर लागला तर सगळे वाह वाह करत होते... पण आता तिला पाच वर्षात फक्त कोणी त्यांची गरज असेल तेंव्हाच काम काढून घेण्यासाठी कॉल करत...)

हो ते पण आहे. जाऊदे परत विसरून जाशील, जे सांगण्यासाठी कॉल केला ते सांग आदी...

( तसे शरयू तिचे सगळे सीक्रेट विरलाच सांगत ).

माझ्या सोबतच्या बऱ्याच डॉक्टरांना कोरोना झाला आहे. मला कालपासून जास्तच भीती वाटतं आहे रे...

का ग ? कशाची भीती..? कोरोनाची..?

अरे माझ्या रूममेट आहेत ना, पूर्वा आणि शबाना त्यांची कोरोना वॉर्डमध्ये पोस्टिंग होती. त्यांना काही दिवसांपासून सर्दी व डोके दुखत होते, परवाला एकीला ताप आला, दुसरीला आज आहे. त्यांनी परवाच टेस्टिंगला स्वब पाठवला. दोघी पोसिटीव्ह आल्यात.

मध्येच तीच बोलणं चालूं असताना विर बोलला.
बापरे... मॅडम तुम्ही काळजी घ्या, दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट व्हाल....

कसली दुसरी रूम आम्हाला क्वारंटाईन केलं व रूम पण सील केली. खाण्या-पिण्याचे वांदे झालेत. एकीला आमच्या हॉस्पिटलमध्ये काल ऍडमिट केलं.

पण ती तिथून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होत आहे, कारण सरकारीमध्ये जवळपास सगळे डॉक्टर पोसिटीव्ह आहेत... कंडिशन खूप खराब आहे. मी सांगू शकत नाही एवढी...

बर.. दुसरी कुठे आहे ?

ती इथेच रूममध्ये आहे, तिला तिचे घरचे प्रायव्हेटमध्ये घेऊन जानार आहेत....
विर मला माहीत आहे,मी नक्की पोसिटीव्ह येणार आहे... कारण मी यांच्या सोबतच असायची...

एस, येण्याची शक्यता जास्त आहे. विर बोलला.

हे पहा विर माझाकडे एवढे पैसे नाहीत, जेवढे प्रायव्हेटमध्ये ऍडमिट होऊन ट्रीटमेंट घेईल. माझी कोणत्याही राजकारन्यांशी ओळखी नाही, की एक कॉल केला की काम होऊन जाईल... प्रायव्हेटमध्ये गेले की दोन लाख तर कुठेच नाही गेले... इतरांचे सर्वांचे माय बाप चिक्कार पैसावाले आहेत. त्यांनी सोबत दहा लाख घेऊन येत आहेत. आमच्या हॉस्पिटलमध्ये बेडही शिक्काल नाहीत. डॉक्टरांसाठी सुद्धा बेड अवेलेबल नाही रे...

काही वेळ शांत होत, ती परत बोलू लागली,

सुरजला (शरयूचा कॉलेजमधील खूप चांगला डॉक्टर मित्र, अगदी जिवा भावाचा) अजून बेड नाही भेटला, तो हॉस्पिटल बाहेर बसून आहे. त्याला लक्षण जास्त नाहीत, तरी तो गोंधळला आहे. आम्हाला पूर्वी कोरोनाचं काही वाटत नव्हतं, पण आता मेडिसिन, फळ आणून द्यायला कोणीही नाही, सगळे मित्र ऍडमिट आहेत, म्हणून भीती वाटते. अरे कितीही झालं तर आम्ही आमच्या हाताने थोडीच सलाईन लावू शकतो ?

शरयूच एक एक बोलनं ऐकुन विरला हादरे बसू लागले... तो पार गोंधळून गेला... पण त्याला; तिला पण धीर द्यायचा होता... म्हणून समजदार पणा दाखवत म्हणाला...

अग, तुला काही होणार नाही. आतापर्यंत तुला लक्षण नाही दाखवले, म्हणजे तुझ शरीर त्या विषाणूच्या विरोधात ऑलरेडी तयार आहे...( खर म्हणजे वीर डॉक्टर नव्हता, पण काही तरी धीर द्यायचा म्हणून बोलू लागला, तिला सावरत होता. खरं तर वीर पण कंगाल आदमी होता... त्याचाकडे पण पैशाची चन चन होतीच)... तरी त्याने तिला सांगितलं, "माझा ओळखीने कुठे काही होते का ते पाहतो..."

हे पहा विर, माझा घरी सद्या काहीच सांगू नको. मला काही झालं, तर तू आई बाबा आणि संजूची काळजी घे...

(हे ऐकून विरला काय बोलायचे सुचेना.)

अग ये, काहीही बोलतेस का. शांत हो तुला ना भूक लागलेली दिसते, म्हणून तू अस बोलते आहेस... मला माहीत आहे की तुला भूक लागली की, तू असं काही बरळतेस.

नाही विर. I am serious. मला वचन दे !

वीरला माहीत होतं, ही काय आता शांत होणार नाही,

बर मी काळजी घेतो त्यांची... आता शांतपणे जेवण करणार का ? टिफिन आला असेल... आणि बाकी पाहतो मी बेड आहे का खाली कोणत्या हॉस्पिटलमध्ये.

( शरयू ही लहान पणापासून जिद्दी आणि अभ्यासात मेहनती. म्हणून शाळेपासून ती "टॉप" येत असे. तिचे आई बाबा खूप गरीब होते, लहान पणापासून घरी आर्थिक दारिद्र्य... घरात इन-मीन चार लोक आई बाबा ती आणि छोटा संजू. तिचे बाबा मजुरी करून त्या दोघांना शिकवत होते, आई खूप मेहनती घरीच शिवण काम करत. शरयूने बारावीत जिह्यात पहिला नुम्बर मिळवून मोठी स्कॉलरशिप मिळवली, त्या पैशाने ती कॉलेज फीस भरत. ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे तिला सवलत नव्हती. कस बस करून तिने उर्वरित खर्चासाठी चार लाखाचं बँकेच कर्ज घेताल. घरून तिला कसलीच बंधने नव्हती, फिरण्यासाठी मोकळीक होती, मित्र मैत्रिणी बनवण्याची मुभा होती. कारण त्यांना तिच्यावर विश्वास होता, जरी काही असेल तर ती सांगेन म्हणून. सोबत तिने पण तिला मिळालेल्या स्वतंत्र्याचा शिक्षणात चांगला फायदा करून घेतला होता. तिला सर्व शिक्षक हुशार असल्याने ओळखत होते. पुढे खूप शिकून MD व्हायचं, मोठी नावाजलेली डॉक्टर होऊन समाज सेवाही करायची असे तिचे स्वप्न आहेत. आर्थिक स्तिथी कठीन होती, पण इच्छाशक्ती दूर्दम्य होती.)

तिला थोडा वेळ बोलून, समजावून शांत करून विचार करून 'मार्ग शोधा' अस सांगून सांगून विर ने फोन ठेवला. शेवटी मार्ग पण मिळाला आणि तिने तिच्या हुशारकीच्या जोरावर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट घेऊन ड्युटी वर परत कर्तव्य बजावण्यासाठी हॉस्पिटल जॉईन केले...

विर दोंघींच्या परिश्रम आणि जिद्दीबद्दल विचार करत होता, त्यांच्या घरी असलेलली आर्थिक परिस्थिती आणि त्या परिस्थितीमुळे मिळालेल्या वागणुकीमधील तफावत समजून घेण्याचा प्रयन्त करत होता....

बराच वेळ विचार करून विर परत एकदा सेपीएन कडे वळला....

( हि कथा काल्पनिक असून, कथेचा कुठे कुणाशी संबंध येत असेल तर तो योगायोग समजावा. समाजातील काही कळीचे मुद्दे आपणा समोर यावेत, हा कथेचा मूळ हेतू आहे.)

                              - लेखक : विनोद (एक-इंसान)  


आमच्या इतर लेख आणि  गोष्टी :

१.  छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.

२. स्री ... सामाजिक दृष्टिकोनाच बुजगावण

३. एक चिट्ठी...

४. हाक... 

५. त्याचे ते निशब्द उत्तर.....

Comments

  1. I think...mulina shikvan ani moth krn yevdhich aai-Baba na chi responsibility nahiy, tr tya shikshanacha kharya arthane mulinchya life madhe purepur upyog karayala sahakaray  karn ha dekhil aai babanchi responsibility cha part ahe.  Kahi palak mulina bandhanat thevtat,tila jas vatel ts vagaayla mubha nasate,kahi ved vakad, chukun mulichya hatun ghadale tr,samaaj kay bolel hi bhiti aste tyana ,yat kuthe tari samajacha pn dosh ahe,mala yek gost kalat nahi  asa samaj jo ki donhi bajune bolto...jyala tyanch swatach tham mat nahiy...asha lokana apn ka priority detoy? Ka tyancha v4 kartoy. Rahila prashn khup money ahe ,property ahe  tyanchya javal tr mg bhau ,tumhi tumachya mulila shikavatahet ch kashala, jr tumhala tila pudhe swabhimani nahi you dyaych tr, education is wasted n as per her point of view😡..,

    Ani mhanta kashe ekadashi lagn kel ki ,tichya saasaarche bagun ghetil, ticha navara hech tich sarwswa asel, to je bolel tich purvadisha,it means ti mulagi ata ya aai babanchi konich nahi,ani lagn ha jugad kelya nantr aai babanche tyanchya mulichya respect madhe aslele sagale hakk sampale?😕😳...he kitpat yogya ahe? Aai babanche soda ho..tya swata mulich kay?...kuthe consider kel jat tich man?.ya lokashahi aslelya desha madhe ,freedom aslelya deshat kuthe muli free ahet? Ji mule lagna agotr aplya gf vr khup prem karat asatat,tila khup motha li swapne dakhavatat,tila hav te freedom dyayala tayar asataat tich por ka br lagn zalyavar aplya bayko shi as freely nahi vagu shakat?  Ya ulat bandhan ladatat. Mazi yek maitrin khup hushar,sundar but behavior thod childish, govt clg madhe amhi doghi hi, diploma madhe ti class topper, then pudhe college topper pn zali.nantr engg sathi tila govt college madhe adamission  bhetal je ki khup marks asun amha konala nahi bhetal.tithehi ti topper ch,achank 2nd yr sampat ale tevha lagn ha jugad tichya samor ala ,gharache bolle tuzya saasaarche tula pudhe shikayala tayar ahet, so ata lagn kr tu..Party khup shrimant ahe,property khup ahe,ti bichari kay bolanar,ticha kon yeknar, tila kay vatat te?kahi bolla tr samaj mhananar uddhat ahe mulagi . Tine lagn kel..ticha jodidar hi property barobr handsome hota disayala. but jevha ti education chi magani karu ulagali tevha tila as sangnyat  al ki yevadh property ahe ani tu shikun kau karnar,bichari ti kahich n bolata ,sansar kartey ticha.mala kadhi kadhi as vatat ki.. ka kunas thauk pn..tila ticha past tense trass nasel ka det? Wht she was and now wht she is! ...

    Ani jaga madhe ashe khup examples ahet ,jya gharat lakshmi nahiy ,tithe saraswati cha khup respect kela jato. Ashe khup palak ahet je ki swatachya potala chimata  deun ,aplya porina shikavatahet.salute to those parents. I think those r the real warriors✌️.Maze baba bsc graduate ahet..but tabyetine sath nahi dili tr te pudhe kahich karu shakale nahit.  ata sadhya hi tyanchya jiv tablets vr ahe, ashya ya situation madhe mazi aadaraniy aai disayala khup sunder, tila tichya yen bhavani madhe kontyahi shrimant mansane lagn karun ghetal ast,education only 8th std, ti swata pudhe houn amhala promote karte.maze aai baba doghe hi tyanch swatach swapn tyanchya mulani purn karav ya sathi hardwork  ghet ale, ani aj amhi tyanchya swapn our tiche khare manskari ahot.naxi mothi bahin ti sadhya assistant nurse mhanun govt job kartey, bhau engineer ahe ani mi dekhil,chota bhau bsc agree karto govt college madhe.mazyahi ghari   vadiloparjit aleli khup property ahe, pn tarihi mazya aai babani kontyahi v4 n karata ,amhala high education dil yevadhech navhe tr...pudhe swabhimani pn banavla .thanks to both of u and salute to both of u😊 .Salute to those parents who r such a great supporter and real king  in their princess's life  .ans such girls r princess of their kingdom💜👑🙌✌✌✌

    ReplyDelete

Post a Comment

Popular Post

तीन मुलांचे चार दिवस - पुस्तक आढावा.

  लेखक - विकास / आदर्श / श्रीकृष्ण प्रकाशन - साधना  पृष्ठ संख्या - 152 (Pages) किंमत - 150₹ लेखक - विकास / आदर्श / श्रीकृष्ण प्रकाशन - साधना  2019 व 2020 मध्ये मी आदिवासी जमाती, आदिवासी भाग तेथील लोक, त्यांचं राहणीमान, त्यांचं खाद्य, त्यांचा पोशाख, मुख्य आकर्षण म्हणजे त्यांची संस्कृती पाहण्याचा योग "निर्माण"मुले आला, त्यानंतर विशेष ठरवूनच भ्रमंती केली. वर्धा जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाडे, तसेच गडचिरोलीतील अतिदुर्गम भाग (जिथे मोबाइलला रेंज नसते) जिथं सामान्य माणूस जाण्यास कचरतोच, असे काही भाग तिथे सामाजिक काम करणाऱ्या मित्रांच्या ओळखीने पाहण्यात व समजून घेण्यात आले.      आजच्या या युगात आदिवासीयांशी  परिस्थिती व त्यांचा बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे, अशा काही तरुणांच्या मी शोधात होतो. काही दिवसापूर्वी मी साधना प्रकाशनात (पुणे) पुस्तक खरेदी करायला गेलो असता, मला तिथे एक पुस्तक दिसले त्याच नाव होतं "तीन मुलांचे चार दिवस". त्या पुस्तकाच्या कव्हर वर तीन मूल सायकल घेऊन पाठीमागे भल्या मोठया बॅगा घेऊन दिसले. मी प्रभावित होऊन ते पुस्तकाचा सारांश वाचला. मला पु...

पुस्तकाचा आढावा - फकिरा

                                               Source : Google पुस्तक : फकिरा लेखक : अण्णाभाऊ साठे प्रकाशन वर्ष : 1959 पुस्तक प्रकार : कादंबरी (स्मृतिपर) मूळ किंमत :120/- पुस्तक पृष्ठ व प्रकाशक: 145 , सुरेश एजनसी अण्णाभाऊंचे साहित्य : तब्बल 32 कादंबऱ्या, 20 कथासंग्रह, जवळपास दोन डझन पोवाडे, तितकेच लोकनाट्य / तमाशे, कित्येक लावण्या व इतर किरकोळ लेखन. "फकिरा" ही कादंबरीचे भारतीय भाषांबरोबर रशियन, झेक, पोलिश, जर्मन या भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत. सोबतच "फकिरा"ला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरवले आहे. लेखकाबद्दल माहिती :         अण्णाभाऊ साठे (1 ऑगस्ट 1920 - 28 जुलै 1969) यांना फक्त 49 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यातील अखेरची तीन दशके त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याची होती. सांगली जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात (वाटेगाव) व गावकुसाबाहेर ठेवलेल्या मांग(दलित) समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना शालेय शिक्षण मिळाले ते जेमतेम अक्षर ओळख ...

छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते

काही दिवसांपूर्वी, स्वराज्याचे संस्थापक आणि आपल्या सर्वांचे लाडके राजे, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची 390वी जयंती . मराठी मातीला स्वराज्याचे स्वप्न दाखवून पुर्ण करणार्या मातीच्या पुत्राची जयंती, आज खूप मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. पण महाराज एकच दिवसाच्या आठवणीसाठी आहेत का? की आयुष्यभराच्या आचारणासाठी?      प्रथम आपण महाराजांचं " स्वराज्य " आणि त्यानंतर "आजची महाराष्ट्रातील पिढी महाराजांचा वारसा कसा पुढे नेत आहे ?", हे या लेखात पाहणार आहोत.      ' स्व'राज्य म्हणजे स्वतःच राज्य . मोठा पराक्रम गाजवून, मराठी रयतेच स्वराज्य महाराजांच्या येण्याने पूर्ण झालं. नक्कीच ते मिळावंण एवढं सोप्प नव्हतच, कारण बलाढ्य अश्या आदिलशाही आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. याबद्दल आपण बालपणी इयत्ता चौथीमधील महाराजांच्या स्वराज्याबद्दल वाचलेच असेल, पण आज काही नवीन गोष्टी महाराजांबद्दल पाहायला मिळणार आहे.       शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आणि  वैभवशाली आहे. शिवाजी महाराज हे एक प्रचंड ज्ञानी, चतुर आणि दुरद...