Skip to main content

पुस्तकाचा आढावा - फकिरा

                                               Source : Google


पुस्तक : फकिरा
लेखक : अण्णाभाऊ साठे
प्रकाशन वर्ष : 1959
पुस्तक प्रकार : कादंबरी (स्मृतिपर)
मूळ किंमत :120/-
पुस्तक पृष्ठ व प्रकाशक: 145 , सुरेश एजनसी
अण्णाभाऊंचे साहित्य : तब्बल 32 कादंबऱ्या, 20 कथासंग्रह, जवळपास दोन डझन पोवाडे, तितकेच लोकनाट्य / तमाशे, कित्येक लावण्या व इतर किरकोळ लेखन.


"फकिरा" ही कादंबरीचे भारतीय भाषांबरोबर रशियन, झेक, पोलिश, जर्मन या भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत. सोबतच "फकिरा"ला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरवले आहे.


लेखकाबद्दल माहिती

       अण्णाभाऊ साठे (1 ऑगस्ट 1920 - 28 जुलै 1969) यांना फक्त 49 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यातील अखेरची तीन दशके त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याची होती. सांगली जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात (वाटेगाव) व गावकुसाबाहेर ठेवलेल्या मांग(दलित) समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना शालेय शिक्षण मिळाले ते जेमतेम अक्षर ओळख एवढेच. वयाच्या अकराव्या वर्षी ते कुटुंबासोबत मुंबईत गेले व तेथेच स्थायिक झाले, तरीही अधूनमधून वाटेगावला चक्कर असायची, गावच्या मातीची नाळ जे जोडलेली होती.
अण्णाभाऊचे मूळ नाव 'तुकाराम भाऊराव साठे' आहे, पण सर्वांना ते अण्णाभाऊ साठे याच नावाने परीचयाचे आहेत. नुकतेच त्यांचे शतकोत्तर जन्मशताब्दी वर्षचालू झाले आहे.

त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. सोबतच ते लोकशाहीर होते. अण्णाभाऊ हे मार्क्सवादी - आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले.

त्यांचा लेखणीची वेगळीच शैली आहे, अण्णाभाऊ इतर लेखकांसारखं अलंकारिक भाषेत लिहित नाहीत. त्यांचं लिखाण परिस्थितीचे चटके सहन करून कनखर बनलेल्या मनाचे प्रतिबिंब आहे. त्यांना दिन दलितांवरील अन्यायाची  जाणीवातून व आत्मअनुभवातून आलेलं लिखाण आहे. कारण त्यांनी लहानपणापासून ते मरेपर्यंत गरिबी जातीवाद, अन्याय, मानसिक, शारीरिक छळ व गुलामगिरी ही पहिली होती, तसेच ते सर्व अनुभवले सुद्धा होतेच. कदाचित याच कारणाने त्यांचा कल हा साम्यवादी वा मार्क्सवादी विचारणसारणी कडे वळला.

कित्येक कादंबरी, कथासंग्रह व इतर लेखन असूनही त्यांना मराठी साहित्य क्षेत्रात तेंव्हा एवढाही वाव मिळाला नाही, जेवढा एखाद दोन साहित्य लिहिणाऱ्या लेखकास मिळाला. अण्णाभाऊ जिवंत होते तेंव्हा "फकिरा" या त्यांचा कादंबरी वर एक चित्रपट याच नावाने लोकांसमोर आला, परंतु त्याला म्हणावा एवढा प्रतिसाद मिळाला नाही. 

अण्णाभाऊंची ख्याती भारतातच नव्हे तर राशियापर्यंत आहे, असं म्हणलं तर काही गैर नाही, कारण त्यांचं लेखनचं एवढं प्रभावशाली आहे. माझा आठवणीत आणभाऊ व्यतिरिक्त असा कोणी मराठी व इतर लेखक नाही, की ज्याचा पुतळा रशियात एक नामांकित  हॉटेलमध्ये बसवण्यात येत आहे (ज्यात जगप्रसिद्ध होऊन गेलेल्या लोकांचे पुतळे आहेत). कोरोनामुळे विलंब झाला, नाही तर त्यांचा 100व्या जन्मशताब्दीला पुतळा तिथे स्थापित होणार होता.

अण्णाभाऊच्या जन्माच्या वेळची फकिराची सत्य गोष्ट आहे, अस अण्णाभाऊने खुद कादंबरीच्या प्रस्तावनेत नमूद केलं आहे.


"फकिरा" कादंबरी बद्दल :

     कादंबरीत मुख्य नायक हे राणोजी व फकिरा आहेत. कादंबरीचा काळ हा 1850 च्या नंतरचा, असं लक्ष्यात येते. तेंव्हा इंग्रजांनी भारतावर आपलं प्रभुत्व नुकतंच मिळवलं होत. त्या काळी अस्पृश्यता भारतीयांचा रक्तातात सळसळत होती अस वाटत. इंग्रजांनी अजूनच निर्दयी व पाशवी अत्याचार पहिल्यापासून भोगत असलेल्या समाजावर काळे कायदे लावून केला (त्यांचं फोडा आणि राज्यकारा हे धोरण त्यांनी आधी यांच्यावरच वापरलं अस वाटते).

कादंबरीच्या सुरुवातीलाच त्याकाळी असलेली महार, मांगाची (कादंबरीत ज्या प्रमाणे जातींचे नाव वापरली, तेच इथे वापरात आहे) दयनीय व वाळीत टाकलेल्या समाजाचं वर्णन आहे. अर्थात या परिस्थिती त्यांना राहिला आवडते म्हणून नाही तर, समाजाणे त्यांना "अस्पृस्य व खालच्या जाती"चे बनवून हे हाल केले होते. सोबतच त्यांना पेशाने चोरी व दरोडेखोरीत अडकवले. याबद्दलच्या कारणांचे वर्णन कादंबरीमध्ये आहे. गावात काम मिळत नसे व तेंव्हा आजच्या एवढी प्रगत शेती ही नव्हती, वर त्यांना शेतजमिनीही नसे. मग अशा परिस्थितीत लेकर-पोरांची पोट कस भरवणार ? बर कसही करून काही काम धंदे मिळवली, तर गावात व पंचक्रोशीत कुठे चोरी व दरोडेखोरीची घटना घडली की सर्वात प्रथम पोलीस यांनाच पकडून नेत (आजही ही परिस्थिती आपण पाहत आहोत), मग त्यापेक्षा हे अशे कारभार करून पोट भरतं.

तसे त्यांना स्वाभिमानी व संस्कारी म्हणणं योग्यच, कारण जरी चोरी, दरोडेखोरी केली तरी ती पोटाला लागेल तेवढच उचलाव व अस करताना 'आया-बहिणीला' आपले "नख" पण लागणार नाही, याची खबरदारी मात्र ते नक्कीच घेत असताना या कादंबरीत दिसते.

'जत्रा' हा मराठी चित्रपट तुम्ही पहिला असेल, तर जोगिनी बद्दल वाचताना नक्की त्याची आठवण येईल. कसा एक महारांचा पोर अख्या गावाची अभ्रू व भल्यासाठी आपल्या जीवाची बाजी करून गावाला "नवसंजीवनी" मिळवून देतो, गावही त्याचा पांग फेडण्यासाठी आयुष्यभर त्याचा ऋणी राहतो, ते पण "जाती पतीच्या पलीकडे" जाऊन. विष्णूपंत कुळकर्णी सारख्या देवमाणूस जेंव्हा महार मांगावर सामाजाणे घातलेल्या बेड्या तोडून जीव लावतो व त्यांचा साठी इंग्रजांसोबतही लढतो, तेंव्हा इतर तथाकथीत मंडळीला हे कसं पचेल बर ?

बर इंग्रज सरकार त्यावेळेस काही चांगल्या गोष्टी पण करीत, असे कदाचित म्हणता येईल. ते कादंबरी शेवटी कळेल, त्याव्यतिरिक्त एक गोष्ट म्हणजे "सरकार कधीही धार्मिक बाबीत ढवळाढवळ" करणार नाही हा आदेशच होता राणीचा. ज्या देशात धर्मसंथाचा सरकार वर अधिकार व ढवळाढवळ असेल तर त्याचे परिणाम, गृहयुद्ध, धार्मिक दंगली, धर्मद्वेष, भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढणे हे पाहताच असाल.

कादंबरीच्या मधोमध फकिराने"वारणेच्या वाघाचा (सतूचा)" जीव कसा वाचवला, याबद्दल दोन चार पानात वर्णन अण्णाभाऊ करायला विसरले नाही.

पूर्ण कादंबरीमध्ये मला कुठेही मांग महार लोकांनी मांसाहार "ढोर खानं" हे वाचायला मिळालं नाही, परंतु प्राणीमात्रावर दया भरभरून दिसून आली.

कोरोना पेक्षा भयानक महामारी येते व महामारी सोबत गळ्यातगळे घालून आलेला दुष्काळ जेंव्हा येतो, तेंव्हा सर्व जातीधर्माच्या भिंती समूळ उखडून पडतात. फक्त आणि फक्त मानसुकी उरते याच प्रासंगिक दर्शन कादंबरीत दिल आहे.

किती लाचारी नं ? माणसाला माणुसकीची जाण येण्यासाठी मोठी महामारी किंवा दुष्काळ यावा लागतो, आता कोरोना काळात आपण पहिलच आहे.

एवढं असूनही गावात एक कुळकर्णी व पाटील हे रुबाब व पाटीलकी न दाखवता या फकिराचा पाठीचा कणा कसे बनले, तसेच "मांगाचं पोर" असलेला फकिराही त्यांचा आत्मसन्मान कसा वाढवत होता, असे भरपूर प्रेरणादायी प्रसंग आपणास वाचावयास मिळेल.

   शिवाजी महाराजांनी दिलेली तलवार फकिरा पर्यंत कशी पोहोचली, याबद्दल माहिती आपणास शेवटी कळेलच.

मला आवडलेल्या आतापर्यंतच्या कादंबरी व कथासंग्रह पैकी मनावर प्रभाव टाकणारी व मनात घर करणारी अशी ही "फकिरा" कादंबरी आहे.  

आपण नक्की वाचून प्रतिक्रिया द्याल.

                               - लेखक : विनोद (एक-इंसान) 


आमच्या इतर लेख आणि  गोष्टी :

१. पुस्तक आढावा - होमो डेअस 

२.  छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.

३. स्री ... सामाजिक दृष्टिकोनाच बुजगावण

४. एक चिट्ठी...

५. त्याचे ते निशब्द उत्तर.....




Comments

  1. शाळेत असताना वाचलं होतं. नंतर एकदा नाना घरी आले तेव्हा भरभरुन कौतुक करत होते. त्यानंतर इतक्या वर्षांनी हे. पुस्तक तर छान आहेच, त्याला कोणाच्या बकेटलिश्टीत पोहचवलं तर खरंच चांगलं काम केलंस. 👌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद रणवीर सर, या पुढे ही तो प्रयत्न चालूच राहील.

      Delete
  2. खूप छान मांडणी केली आहे...अगदी थोडक्यात कादंबरीची ओळख करून दिल्याबद्दल व अण्णाभाऊंचे साहित्य लोकांपर्यंत नेल्याबद्दल तुझे अभिनंदन...अण्णाभाऊंच्या साहित्यातून समाजातील शोषित, वंचित लोकांच्या समस्या अधोरेखित झाल्या...त्यांच्या हलाखीच्या जीवनाची ओळख शहरातील लोकांना झाली...त्यांच्या साहित्याने ग्रामीण भागातील तरुणांमध्ये सामाजिक समतेच्या क्रांतीची ठिणगी पेटली...'माझी मैना गावाकडे राहिली' ही छक्कड लिहून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले...त्यांच्या साहित्याचा व्यापक संचार, संशोधन व चर्चा होण्याची आज गरज आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सर्वात प्रथम धन्यवाद गौरव. आपला म्हणणं अगदी बराबर आहे, ज्याला अण्णाभाऊ समजले त्यांना गरिबी, न्याय-अन्याय, दारिद्र्य, कष्ट, संघर्ष या गोष्टीची जाण असते किंवा नाईल तर येऊन जातेच. "माझी मैना गावाकडे राहिली" या छक्कडचा अर्थ आपल्या रसिक मंडळीने वेगळाच घेतला, जस की त्यांना वाटलं की हे कोण्या दिवाण्याच्या मनातील शब्द आहेत, पण ते तस नव्हतच. गरिबीमुळे लोकांना आपल्या बायको पोरांना गावाकडून शहराकडे मोल मजुरी करायला यावं लागत होतं, त्याच्याच मनाची स्तिथी त्या छक्कड मधून अण्णाभाऊने मंडळी आहे.

      Delete
  3. संक्षिप्तपणे पूर्ण मांडणी केली....Keep it up👍🤗

    ReplyDelete
  4. फकीरा वाचून खुप वर्षे झाली पण कुणी विचारलं की आवडत्या कादंबरी कोणकोणत्या?

    तर त्या यादीत फकीराचं नाव असतेच.

    अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणी कालातीत आहे... शब्दांची धार अजूनही तीक्ष्ण आहे.

    जर मी फकीराचं शब्दांकन करायचं ठरवलं असतं तर विनोद ने केलेल्या शब्दांकनापेक्षा कमीच झालं असतं.

    Very nice Vinod 👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular Post

तीन मुलांचे चार दिवस - पुस्तक आढावा.

  लेखक - विकास / आदर्श / श्रीकृष्ण प्रकाशन - साधना  पृष्ठ संख्या - 152 (Pages) किंमत - 150₹ लेखक - विकास / आदर्श / श्रीकृष्ण प्रकाशन - साधना  2019 व 2020 मध्ये मी आदिवासी जमाती, आदिवासी भाग तेथील लोक, त्यांचं राहणीमान, त्यांचं खाद्य, त्यांचा पोशाख, मुख्य आकर्षण म्हणजे त्यांची संस्कृती पाहण्याचा योग "निर्माण"मुले आला, त्यानंतर विशेष ठरवूनच भ्रमंती केली. वर्धा जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाडे, तसेच गडचिरोलीतील अतिदुर्गम भाग (जिथे मोबाइलला रेंज नसते) जिथं सामान्य माणूस जाण्यास कचरतोच, असे काही भाग तिथे सामाजिक काम करणाऱ्या मित्रांच्या ओळखीने पाहण्यात व समजून घेण्यात आले.      आजच्या या युगात आदिवासीयांशी  परिस्थिती व त्यांचा बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे, अशा काही तरुणांच्या मी शोधात होतो. काही दिवसापूर्वी मी साधना प्रकाशनात (पुणे) पुस्तक खरेदी करायला गेलो असता, मला तिथे एक पुस्तक दिसले त्याच नाव होतं "तीन मुलांचे चार दिवस". त्या पुस्तकाच्या कव्हर वर तीन मूल सायकल घेऊन पाठीमागे भल्या मोठया बॅगा घेऊन दिसले. मी प्रभावित होऊन ते पुस्तकाचा सारांश वाचला. मला पु...

छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते

काही दिवसांपूर्वी, स्वराज्याचे संस्थापक आणि आपल्या सर्वांचे लाडके राजे, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची 390वी जयंती . मराठी मातीला स्वराज्याचे स्वप्न दाखवून पुर्ण करणार्या मातीच्या पुत्राची जयंती, आज खूप मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. पण महाराज एकच दिवसाच्या आठवणीसाठी आहेत का? की आयुष्यभराच्या आचारणासाठी?      प्रथम आपण महाराजांचं " स्वराज्य " आणि त्यानंतर "आजची महाराष्ट्रातील पिढी महाराजांचा वारसा कसा पुढे नेत आहे ?", हे या लेखात पाहणार आहोत.      ' स्व'राज्य म्हणजे स्वतःच राज्य . मोठा पराक्रम गाजवून, मराठी रयतेच स्वराज्य महाराजांच्या येण्याने पूर्ण झालं. नक्कीच ते मिळावंण एवढं सोप्प नव्हतच, कारण बलाढ्य अश्या आदिलशाही आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. याबद्दल आपण बालपणी इयत्ता चौथीमधील महाराजांच्या स्वराज्याबद्दल वाचलेच असेल, पण आज काही नवीन गोष्टी महाराजांबद्दल पाहायला मिळणार आहे.       शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आणि  वैभवशाली आहे. शिवाजी महाराज हे एक प्रचंड ज्ञानी, चतुर आणि दुरद...